Maruti S-Presso : पगार फक्त २५ हजार? तरीही ही कार सहज सांभाळू शकता, आताच वाचा..
Maruti Suzuki S-Presso : मारुती सुझुकी सामान्य मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशा स्वस्त कार आणत असते. कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक मॉडेल आणले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पगारदारांसाठी कमी बजेटची कार
उन्हात तापत, पावसात भिजत आणि थंडीत कुडकुडत बाईकवरून किती दिवस प्रवास करणार? कार घेतल्यास आरामात फिरता येईल, असा अनेकांना वाटतं. पण कमी पगारात कार घेणं हे मध्यमवर्गीयांसाठी स्वप्नच राहतं. कमी पगार आणि जास्त डाउन पेमेंट, EMI यामुळे इच्छा असूनही कार घेता येत नाही. अशा लोकांसाठी मारुती सुझुकीने एक बजेट फ्रेंडली कार आणली आहे.
एस-प्रेसोची किंमत किती आहे?
महिन्याला फक्त 20,000 ते 25,000 रुपये कमावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी मारुती सुझुकी एस-प्रेसो हा उत्तम पर्याय आहे. याची सुरुवातीची किंमत 3,50,000 रुपये आहे. टॉप व्हेरिएंटची किंमत 5,50,000 रुपयांपर्यंत आहे (राज्य आणि शहरानुसार किंमत बदलते). काही डाउन पेमेंट भरून बाकीची रक्कम EMI मध्ये भरता येते.
दरमहा किती EMI भरावा लागेल?
मारुती सुझुकी एस-प्रेसो EMI वर घेण्यासाठी फक्त 1-2 लाख रुपये डाउन पेमेंट करा. मासिक EMI 8-10 हजार रुपयांपर्यंत असेल. तुमचा पगार 25,000 रुपये असला तरी तुम्ही हे सहज भरू शकता आणि तुमच्या कारचे स्वप्न पूर्ण करू शकता. पगारातील पैशातून कारचा मेंटेनन्स आणि इतर खर्चही भागवता येतो.
तब्बल ३३ किलोमीटरचे मायलेज!
मारुती सुझुकी एस-प्रेसो कारला मिनी एसयूव्ही लूक मिळतो. जास्त ग्राउंड क्लिअरन्समुळे खेड्यापाड्यातील आणि लहान शहरांमधील खराब रस्त्यांवरही चांगली कामगिरी करते. याचे मायलेज 24-26 kmpl आहे. इंधनाचा खर्च आणखी कमी करण्यासाठी CNG हा उत्तम पर्याय आहे. एक किलो CNG मध्ये 33 किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो. मात्र, पेट्रोलपेक्षा CNG कारची किंमत जास्त असते.
मारुती सुझुकी एस-प्रेसोचे फीचर्स
मारुती सुझुकी एस-प्रेसो 1-लिटर पेट्रोल इंजिनसह येते. हे 66PS हॉर्सपॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करते. तर CNG मॉडेल 56PS हॉर्सपॉवर आणि 82Nm टॉर्क निर्माण करते. यावरून CNG पेक्षा पेट्रोल इंजिनचा पिकअप जास्त आहे. नवीन एस-प्रेसोमध्ये टच स्क्रीन, USB कनेक्टिव्हिटी, पॉवर विंडोज आणि कीलेस एंट्री यांसारखे फीचर्स आहेत.

