किवी खाण्याचे फायदे: अनेक आजार राहतील दूर
सर्वात पौष्टिक फळांपैकी एक म्हणजे 'किवी'. किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. किवी हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि शक्तिशाली वनस्पती संयुगांनी समृद्ध असलेले फळ आहे. व्हिटॅमिन सी शरीरात एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.

आरोग्यदायी फळ
व्हिटॅमिन सी आणि ई सारख्या अँटिऑक्सिडंट पोषक तत्वांव्यतिरिक्त, किवी हे वनस्पती संयुगांचा एक उत्तम स्रोत आहे, ज्यात अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. अभ्यासानुसार, कॅरोटीनॉइड्सयुक्त आहारामुळे हृदयरोगसारख्या काही आरोग्य समस्यांपासून संरक्षण मिळू शकते.
किवी : हृदयासाठी उत्तम
किवी खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. अभ्यासानुसार, किवी खाल्ल्याने उच्च रक्तदाबासह हृदयरोग होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
रक्तातील साखर नियंत्रित करते
किवीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर असते. यातील विरघळणारे फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच ते आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देते.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवते
किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे पोषक तत्व पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानीपासून वाचवते आणि शरीरात इतर अनेक महत्त्वाची कार्ये करते. रोगप्रतिकारशक्तीसाठी व्हिटॅमिन सीची पातळी राखणे आवश्यक आहे.
मधुमेहींसाठी योग्य फळ
किवी फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहींसाठी हे एक योग्य फळ आहे. किवी खाल्ल्याने ॲडिपोजेनेसिस नियंत्रित राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका टाळता येतो.

