Jio Cinema ची नेटफ्लिक्स-अ‍ॅमेझॉनला टक्कर, कंपनीकडून 'या' धमाकेदार प्लॅनची घोषणा

| Published : May 27 2024, 10:20 AM IST / Updated: May 27 2024, 10:25 AM IST

Jio Cinema New Plan

सार

नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या जिओने एका धमाकेदार प्लॅनची घोषणा केली आहे. यामुळे युजर्सला कमी किंमतीत ओटीटी प्लॅटफॉर्मची मजा घेता येणार आहे.

Jio Yearly Plan :  मुकेश अंबानी यांनी नेटफ्लिक्स (Netflix) आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) कंपनीला मोठी टक्कर देण्यासासाठी धमाकेदार प्लॅन तयार केला आहे. खरंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी पुन्हा मोठा डाव खेळत अ‍ॅमेझॉन-नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची सुट्टी करण्यासाठी तयार आहेत. अशातच रिलायन्स जिओने आपल्या युजर्सला मोठे गिफ्ट दिले आहे. कंपनीने प्रीमियम अ‍ॅन्युअल नावाचा एक अ‍ॅड-फ्री प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे.

दरम्यान, अ‍ॅमेझॉन-नेटफ्लिक्सच्या वार्षिक प्लॅनच्या प्रीमिअमची किंमत हजारो रुपये आहेत. पण रिलायन्स जिओच्या वार्षित प्लॅनची किंमत केवळ 299 रुपये ठेवण्यात आली आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

299 रुपयांच्या प्लॅनची खासियत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी अ‍ॅड फ्री असणारा नवा प्रीमिअम सब्सक्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. या प्रीमियम कंटेटसाठी 299 रुपयांचा प्लॅन बेस्ट मानला जात आहे. नव्या अ‍ॅड फ्री प्रीमियम प्लॅनमध्ये 12 महिन्यांसाठी युजर्सला केवळ 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.

जिओ प्रीमियम अ‍ॅन्युअल प्लॅन
नव्या प्रीमियम अ‍ॅन्युअल प्लॅनसह युजर्सला एका वर्षांपर्यंत जाहिरातींशिवाय प्रीमियमसह सर्व कंटेट पाहता येणार आहेत. याशिवाय 4k क्वालिटीमध्ये कंटेट पाहता येणार आहे. या मोबाइल अ‍ॅपवर ऑफलाइन मोडवरही कंटेट पाहता येणार आहे. ग्राहकांना कनेक्टेड टीव्हीसह कोणत्याही डिवाइसवर एक्सक्लूसिव्ह सीरिज, सिनेमा, हॉलिवूडमधील कंटेट, मुलांसाठी शो आणि टीव्ही मनोरंजन पाहण्याची सुविधा मिळणार आहे.

जिओचा प्रीमियम अ‍ॅन्युअल प्लॅन युजर्सला कंपनीच्या अधिकृत वेबसाइट अथवा मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून सब्सक्राइब करता येणार आहे. परंतु कंपनीने हे स्पष्ट केले नाहीय की, एक स्क्रिन किंवा त्यापेक्षा अधिक स्क्रिनसाठी हा प्लॅन उपलब्ध असणार आहे की नाही.

महिन्याभराच्या प्लॅनपेक्षा अधिक स्वस्त प्लॅन
जिओ सिनेमाचा महिन्याभराच्या प्लॅनपेक्षा वार्षिक प्लॅन उत्तम आहे. प्रमोशनल ऑफरच्या कारणास्तव महिन्याभरासाठी सिंगल स्क्रिन प्लॅनची किंमत 29 रुपये प्रति महिना आहे. अशाप्रकारे वर्षभरासाठी युजर्सला 348 रुपये मोजावे लागतात. पण जिओच्या नव्या 299 रुपयांत वर्षभराचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनला मिळणार टक्कर
अ‍ॅमेझॉन आणि नेटफ्लिक्सला जिओच्या नव्या प्लॅनमुळे टक्कर मिळणार आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन 99 रुपये ते 149 रुपयांदरम्यान आहेत. याशिवाय प्लॅटफॉर्मची सुविधा आणि व्हिडीओ क्वालिटीनुसार वेगवेगळे शुल्क ग्राहकांकडून आकारले जातात.

आणखी वाचा : 

WhatsApp वर प्रोफाइल फोटोसाठी खास फिचर होणार लाँच, दररोज बदलता येईल DP

नवे हेल्मेट खरेदी करताना या 6 गोष्टींकडे द्या लक्ष, अपघाताच्या स्थितीपासून राहाल दूर