सार

WhatsApp Update : व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच एक खास फीचर रोलआउट होणार आहे. खरंतर, प्रोफाइल फोटो बदलण्यासंदर्भातील नवे फीचर असणार असल्याचे सांगितले जात आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

WhatsApp New Feature :  व्हॉट्सअ‍ॅप आणि मेटा AI चॅटबॉट एकत्रिपणे काही नव्या सुविधा घेऊन येणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, युजर्सला मेसेजिंग अ‍ॅपवर AI जनरेटेड प्रोफाइल तयार करणे आणि वापरण्याचा पर्याय दिला जाणार आहे. नवे AI फीचर लवकरच युजर्ससाठी रोलआउट केले जाणार आहे. WABetaInfo द्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, AI जनरेटेड प्रोफाइल फोटोसाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून अ‍ॅन्ड्रॉइडवर काही बीटा टेस्टर्ससोबत नव्या फीचरची चाचणी करत आहे.

काय आहे नवे फीचर?
नव्या AI फीचरच्या बीटा वर्जनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये क्रिएट AI प्रोफाइल पिक्चर नावाचा एक नवा सेक्शन दिला आहे. म्हणजेच तुम्ही मूळ रुपात आपल्या डिस्क्रिप्शनच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा फोटो तयार करण्यासाठी AI टूलचा वापर करू शकता.

टिपस्टरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, AI द्वारे प्रोफाइल फोटोसह युजर्सला युनिक आणि पर्सनलाइज्ड फोटो तयार करता येणार आहे. खरंतर, व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सची प्रायव्हेसी लक्षात घेता त्यांच्यासाठी फोटो कॉपी करणे आणि कंटेटचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यावर बंदी घालण्यासाठी काही मोठे बदल केले आहेत. मेसेजिंग अ‍ॅपने आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉइड अशा दोन्ही वर्जनच्या व्हॉटअ‍ॅपवरुन एखाद्याचा प्रोफाइल फोटो अथवा व्हिडीओचा स्क्रिनशॉट काढण्यावर बंदी घातली आहे.

स्टेटस अपडेट करण्याची पद्धत बदलणार
व्हॉट्सअ‍ॅपकडून स्टेटससाठी एका मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ शेअर करण्याचे फीचर सुरू केल्याची चर्चा सुरू झाली होती. खरंतर, ही सुविधा काही बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. दरम्यान, WABetaInfo द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, काही युजर्सला हे फीचर आधीच्या अपडेटच्या माध्यमातून मिळू शकते. WB ने सांगितलेय की, एका मिनिटांपर्यतचे स्टेटस अपडेट करण्याचे फीचर iOS 24.10.10.74 अपडेटमध्ये दिले जाईल. याआधी स्टेटस केवळ 30 सेकंदासाठीच ठेवण्याची परवानगी होती.

आणखी वाचा :

नवे हेल्मेट खरेदी करताना या 6 गोष्टींकडे द्या लक्ष, अपघाताच्या स्थितीपासून राहाल दूर

Apple युजर्ससाठी अ‍ॅलर्ट, करा हे काम अन्यथा पडाल संकटात