सार

Helmet Buying Tips : नवे हेल्मेट खरेदी करताना सर्वाधिक महत्त्वाची बाब अशी की, ते घातल्यानंतर कंम्फर्टेबल वाटण्यासह सुरक्षित असले पाहिजे. अशातच हेल्मेट खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Helmet Buying Tips : दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट घालणे सर्वाधिक महत्त्वाची बाब आहे. दररोजची काही कामे, ऑफिसला दुचाकीवरुन येताना-जाताना हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे. खरंतर वाहतूकीच्या नियमांमध्ये हेल्मेटचा वापर का करावा याबद्दल सविस्तर सांगितले आहे. तरीही बहुतांशजण दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मट घालत नाही. अशातच एखाद्या दुर्घटनेला बळी पडतात. तुम्ही नवे हेल्मेट खरेदी करण्याचा विचार करताय का? पुढील काही टिप्स नक्कीच लक्षात ठेवा. जेणेकरुन प्रवासावेळी अपघाताच्या स्थितीपासून नेहमीच बचाव होईल.

डोक्याच्या आकाराकडे लक्ष द्या
नवे हेल्मेट खरेदी करताना महत्त्वाची गोष्ट अशी की, तुमच्यासाठी आरामदायी असावे. याशिवाय डोक्याचा आकारही तुम्हाला माहिती असावा. यामुळे हेल्मेट व्यवस्थितीत डोक्यात बसले जाईल.

वाइजर तपासून पहावे
हेल्मटेमधील महत्त्वपूर्ण हिस्सा वाइजरचा असतो. याकडे बहुतांशजण दुर्लक्ष करतात. रात्री किंवा पावसाळ्यात वाहन चालवताना वाइजरची फार गरज भासते. अशातच अधिक कॉस्मेटिक डिझाइन असणारे वाइजरएवजी उत्तम व्हिजिबिलिटी असणारे निवडा.

वेटिंलेशनची काळजी घ्या
उन्हाळ्याच्या दिवसात दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेटच्या माध्यमातून वेंटिलेशन होणे फार महत्त्वाचे असते. अन्यथा श्वसनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

कुशिंगकडे लक्ष द्या
एखाद्या दुर्घटनेवेळी डोक्याच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटची कुशिंग उत्तम असणे फार महत्त्वाचे असते. जेणेकरुन तुम्ही दुकाचीवरुन पडल्यास डोक्याचा भाग बचावला जाऊ शकतो.

सर्टिफिकेशन तपासून पाहा
नवे हेल्मेट खरेदी करताना लक्षात ठेवा की, एखाद्या अथॉरिटीद्वारे प्रमाणित असावेत. हेल्मेटवर कमीतकमी ISI मार्क असावा. खरंतर, आयएसआय मार्क भारतीय मानक संस्थेचे चिन्ह असून प्रत्येक हेल्मेटवर असणे बंधनकारक आहे.

हेल्मेट उघडणे-बंद करण्याची सिस्टिम
हेल्मेट खरेदी करताना ते बंद आणि उघडण्याची सिस्टिम व्यवस्थिती आहे की नाही तपासून पाहा. हल्मेटला दिलेले क्लच अधिक घट्ट असल्यास गळ्याच्या येथे दबाव पडू शकतो. याशिवाय क्लच अधिक सैलही नसावे. हेल्मेटला दिलेला क्लच उघडण्यासह बंद करणे शक्य होईल असा असावा. कॉम्प्लिकेटेड क्लच असणारे हेल्मेट धोकादायक असतात.

हेल्मेट खरेदी करताना करु नका या 6 चूका

  • हेल्मेट कधीही फुटपाथ किंवा रस्त्यालगतच्या विक्रेत्यांकडून खरेदी करू नये.
  • हेल्मेटचे मानक वजन 1.2 किलो आहे. यापेक्षा अधिक वजनाचे हेल्मेट खरेदी करू नका.
  • स्टाइलिश दिसणाच्या नादात तुमच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू नका.
  • ब्रँडेड हेल्मेटचे कॉपी वर्जन खरेदी करू नका.
  • महिलांसाठी मिळणारे हाफ कव्हर असणारे हेल्मेट कधीच वापरू नये.
  • हेल्मेटच्या रंगापेक्षा त्याच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावी.

आणखी वाचा : 

प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या फोनमध्ये सेव्ह असावेत हे 4 महत्त्वाचे क्रमांक, लगेच होईल समस्येचे निवारण

Driving License New Rules 2024: 1 जूनपासून कोणत्या नियमांना किती दंड, अल्पवयीन असल्यास काढता येणार परवाना,वाचा सविस्तर