MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; आता सामान्य प्रवाशांचा प्रवास होणार 'हायटेक' आणि स्वच्छ

रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; आता सामान्य प्रवाशांचा प्रवास होणार 'हायटेक' आणि स्वच्छ

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'मिशन ५२' अंतर्गत रेल्वेमध्ये मोठ्या सुधारणांची घोषणा केली आहे. याची सुरुवात सर्वाधिक गर्दी असणाऱ्या जनरल डब्यांच्या स्वच्छतेपासून होणार असून, यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 15 2026, 05:07 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा
Image Credit : iSTOCK

रेल्वेच्या जनरल डब्याचा चेहरामोहरा बदलणार! अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा

Indian Railway Update: भारतीय रेल्वेने आता खऱ्या अर्थाने 'आम आदमी'च्या प्रवासाकडे लक्ष केंद्रित केले आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता केवळ एसी किंवा स्लीपरच नव्हे, तर जनरल डबेही चकाचक दिसणार आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आठवड्याला ५२ सुधारणांचे लक्ष्य!
Image Credit : Social Media

आठवड्याला ५२ सुधारणांचे लक्ष्य!

रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी 'मिशन ५२' जाहीर केले आहे. म्हणजेच, रेल्वेमध्ये दर आठवड्याला एक याप्रमाणे वर्षभरात ५२ मोठ्या सुधारणा केल्या जाणार आहेत. याची सुरुवात सर्वाधिक गर्दी असणाऱ्या जनरल डब्यांच्या स्वच्छतेपासून होणार आहे. 

Related Articles

Related image1
गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
Related image2
शेतीजमीन NA करण्याची गरज संपली! सरकारचा मोठा निर्णय; जमीनमालकांना नेमका काय फायदा?
35
आता जनरल डबेही असणार चकाचक!
Image Credit : FREEPIK

आता जनरल डबेही असणार चकाचक!

आतापर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एसी आणि स्लीपर कोचच्या स्वच्छतेवर भर दिला जात असे. मात्र, जनरल डब्यांची अवस्था अनेकदा दयनीय असायची. आता हे चित्र बदलणार आहे.

नियमित स्वच्छता: जनरल डब्यातील शौचालये, वॉशबेसिन आणि कचरापेट्यांची दररोज कसून साफसफाई केली जाईल.

नवे नियोजन: जनरल डबे आतून जोडलेले नसले तरी, गाडी स्टेशनवर थांबताच स्वच्छता कर्मचारी तातडीने डब्यात शिरून स्वच्छतेचे काम पूर्ण करतील. 

45
एआय (AI) ठेवणार स्वच्छतेवर नजर
Image Credit : our own

एआय (AI) ठेवणार स्वच्छतेवर नजर

रेल्वे आता स्वच्छतेसाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा वापर करणार आहे.

कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केल्यावर डब्याचे फोटो कंट्रोल रूमला पाठवणे अनिवार्य असेल.

AI तंत्रज्ञान त्या फोटोंची पडताळणी करेल की खरोखर स्वच्छता झाली आहे की नाही.

कामात कुचराई झाल्यास संबंधित कंत्राटदार कंपनीवर कडक दंडात्मक कारवाई केली जाईल.

सुपरवायझरसाठी १२ वी उत्तीर्ण आणि ITI ही शैक्षणिक पात्रता अनिवार्य करून कामाचा दर्जा सुधारला जाणार आहे.

55
कार्गो नेटवर्कमधून ३० हजार कोटींची कमाई
Image Credit : Getty

कार्गो नेटवर्कमधून ३० हजार कोटींची कमाई

केवळ प्रवासी सेवाच नाही, तर रेल्वेच्या उत्पन्नासाठी 'गतीशक्ती कार्गो टर्मिनल'चा मोठा विस्तार केला जाणार आहे. पुढील पाच वर्षांत ५०० नवीन टर्मिनल्स उभारण्याचे नियोजन असून, त्यातून रेल्वेला तब्बल ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
Recommended image2
शेतीजमीन NA करण्याची गरज संपली! सरकारचा मोठा निर्णय; जमीनमालकांना नेमका काय फायदा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved