MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • शेतीजमीन NA करण्याची गरज संपली! सरकारचा मोठा निर्णय; जमीनमालकांना नेमका काय फायदा?

शेतीजमीन NA करण्याची गरज संपली! सरकारचा मोठा निर्णय; जमीनमालकांना नेमका काय फायदा?

Maharashtra NA rule change: राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात बदल करून शेतीजमीन बिगर कृषी NA करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र एन.ए. आदेशाची अट रद्द झाली असून, वार्षिक कराऐवजी एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरावे लागेल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 12 2026, 05:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
शेतीजमीन NA करण्याची गरज संपली! सरकारचा मोठा निर्णय
Image Credit : social media

शेतीजमीन NA करण्याची गरज संपली! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण दुरुस्ती करत बिगर कृषी (NA) प्रक्रियेत मोठी सुलभता आणली आहे. आतापर्यंत शेतीजमीन अकृषक वापरासाठी रूपांतरित करताना जिल्हाधिकाऱ्यांची स्वतंत्र मंजुरी आणि एन.ए. आदेश घेणे बंधनकारक होते. मात्र नव्या निर्णयानुसार ही अट रद्द करण्यात आली असून प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सुधारणांची अंमलबजावणी केली आहे. 

26
काय बदल झाला?
Image Credit : unsplash

काय बदल झाला?

जमीन महसूल कायद्यात सुधारणा करून अकृषक कर आकारणीची जुनी पद्धत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी शेतीजमीन बिगर कृषी वापरासाठी बदलल्यानंतर दरवर्षी अकृषक कर भरावा लागत असे. आता हा वार्षिक कर रद्द करण्यात आला असून जमीनमालकांना फक्त एकदाच ‘रूपांतरण अधिमूल्य’ (Conversion Premium) भरावे लागणार आहे. ही एकरकमी रक्कम भरल्यानंतर जमीन अधिकृतपणे बिगर कृषी वापरासाठी रूपांतरित करता येईल. त्यामुळे पुढील वार्षिक आर्थिक भार टळणार आहे. 

Related Articles

Related image1
जमिनीच्या वादातून होणार सुटका! महसूल विभागाचा 'डिजिटल' दणका; आता थेट ईमेलवर येणार नोटीस
Related image2
Pune Nagpur Special Train : पुणे–नागपूर मार्गावर विशेष रेल्वेगाड्या; मध्य रेल्वेचा निर्णय, फेब्रुवारीत चार सुपरफास्ट फेऱ्या
36
एन.ए. आदेशाची गरज नाही
Image Credit : social media

एन.ए. आदेशाची गरज नाही

सर्वात मोठा बदल म्हणजे स्वतंत्र एन.ए. सनद घेण्याची अट हटवण्यात आली आहे. यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संबंधित प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडा मंजूर झाला की, त्यालाच एन.ए. मंजुरी मानले जाईल. त्यामुळे महसूल विभागाकडून वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. ही सुधारित कार्यपद्धती अमलात आली असून त्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

46
जुनी प्रक्रिया कशी होती?
Image Credit : social media

जुनी प्रक्रिया कशी होती?

पूर्वी जमीन निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र अर्ज सादर करावा लागत असे. त्यासोबत नकाशे, कागदपत्रे, विविध विभागांची पडताळणी आणि तपासण्या आवश्यक असत. ही प्रक्रिया अनेकदा काही महिने किंवा वर्षभरही लांबत असे. परिणामी जमीनमालकांना वेळ, खर्च आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असे. नव्या प्रणालीत या टप्प्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. 

56
जमीनमालक आणि उद्योगांसाठी काय फायदे?
Image Credit : social media

जमीनमालक आणि उद्योगांसाठी काय फायदे?

वार्षिक अकृषक कराचा भार संपुष्टात

एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरून प्रक्रिया पूर्ण

स्वतंत्र एन.ए. परवानगीची गरज नाही

वेळ आणि खर्चाची बचत

प्रशासनिक फेऱ्यांमध्ये घट 

66
रिअल इस्टेट आणि औद्योगिक प्रकल्पांना गती
Image Credit : social media

रिअल इस्टेट आणि औद्योगिक प्रकल्पांना गती

या निर्णयामुळे गुंतवणूकदारांसाठी वातावरण अधिक अनुकूल होण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना चालना मिळू शकते. ग्रामीण भागातील जमीनमालकांनाही आपल्या जमिनीचा वापर बदलणे आता तुलनेने सोपे होणार आहे. एकूणच, सरकारच्या या निर्णयामुळे जमीन रूपांतरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि कमी खर्चिक होण्याची अपेक्षा आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Weather Alert: महाराष्ट्रावर 'दुहेरी' संकट! कुठे पावसाचा कडकडाट तर कुठे उष्णतेची लाट; १४ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी
Recommended image2
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! १ जानेवारी २०११ पूर्वीची १५०० चौ. फुटांपर्यंतची घरे होणार नियमित
Recommended image3
Ashok Kharat Case : ‘अंकशास्त्रज्ञ’ अशोक खरात गणितात नापास! शैक्षणिक वास्तव समोर आल्याने चर्चांना उधाण
Recommended image4
Pimpri Chinchwad Traffic Advisory : रामनवमी उत्सवासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक निर्बंध; अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्गांची घोषणा
Recommended image5
Ashok Kharat Case : महाराष्ट्राचा 'एपस्टीन'! विद्यार्थिनी, गर्भवती महिलांना बनवलं शिकार; अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे
Related Stories
Recommended image1
जमिनीच्या वादातून होणार सुटका! महसूल विभागाचा 'डिजिटल' दणका; आता थेट ईमेलवर येणार नोटीस
Recommended image2
Pune Nagpur Special Train : पुणे–नागपूर मार्गावर विशेष रेल्वेगाड्या; मध्य रेल्वेचा निर्णय, फेब्रुवारीत चार सुपरफास्ट फेऱ्या
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved