MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार

गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार

रेल्वे मंत्रालयाने मनमाड ते कसारा दरम्यान तिसऱ्या, चौथ्या रेल्वे लाईनसाठी १०,१५४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार असून, कसारा घाटातील बँकरची समस्या दूर होईल.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 15 2026, 04:04 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
गुड न्यूज! संभाजीनगर मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट
Image Credit : social media

गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट

मुंबई: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मनमाड ते कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्यासाठी तब्बल १०,१५४ कोटी रुपयांच्या महाकाय निधीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवासातील वेळ तर वाचणारच आहे, पण प्रवासाचा दर्जाही सुधारणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
प्रवासाचा कायापालट, काय आहे रेल्वेचा प्लॅन?
Image Credit : South Western Railways - SWR

प्रवासाचा कायापालट, काय आहे रेल्वेचा प्लॅन?

१३५ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या नवीन मार्गामुळे रेल्वे वाहतुकीतील सर्वात मोठा अडथळा दूर होणार आहे.

बँकरची कटकट मिटणार: कसारा घाटातील तीव्र चढ-उतारामुळे सध्या गाड्यांना अतिरिक्त इंजिन (बँकर) लावावे लागते. नवीन लाईनमुळे ही गरज भासणार नाही, परिणामी इगतपुरी आणि कसारा येथे इंजिन जोडण्यासाठी वाया जाणारा वेळ वाचणार आहे.

वेळेची मोठी बचत: या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा किमान २५ ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

लोकल रेल्वेचे स्वप्न होणार साकार: नाशिक-मुंबई दरम्यान दररोज अप-डाऊन करणाऱ्यांसाठी 'नाशिक-मुंबई लोकल' सुरू होण्याची शक्यता आता अधिक बळकट झाली आहे. 

Related Articles

Related image1
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची ५००० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' भागात मिळणार सुवर्णसंधी
Related image2
Maharashtra Weather : राज्यात उष्णतेची लाट; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता
34
प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि व्याप्ती
Image Credit : our own

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि व्याप्ती

हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून आधुनिक इंजिनिअरिंगचा नमुना असणार आहे. यात खालील गोष्टींचा समावेश असेल

एकूण लांबी: १३१ किमी नवीन रेल्वेमार्ग.

बोगदे: एकूण २८ किमी लांबीचे ५ अत्याधुनिक बोगदे.

पूल: १६ महत्त्वाचे पूल, २१८ लहान पूल आणि ५ अवघड पूल.

कनेक्टिव्हिटी: २१ अंडरपास आणि ५ ओव्हरब्रिजमुळे रस्ते वाहतुकीलाही अडथळा येणार नाही. 

44
कोणाकोणाला होणार फायदा?
Image Credit : Google

कोणाकोणाला होणार फायदा?

१. मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांचा वेग वाढेल.

२. उत्तर भारत: भुसावळमार्गे उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

३. मालवाहतूक: इंधनाची आणि वेळेची बचत झाल्यामुळे मालवाहतुकीची क्षमता चारपटीने वाढण्याची अपेक्षा आहे.

४. मनमाड जंक्शन: दौंड-मनमाड आणि संभाजीनगर-मनमाड दुहेरीकरणामुळे मनमाड रेल्वे स्थानक आता महाराष्ट्रातील एक प्रमुख 'कनेक्टिव्हिटी हब' म्हणून उदयास येणार आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
छ. संभाजीनगर बातम्या
मराठवाड्याच्या बातम्या
Recommended Stories
Recommended image1
सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात झाली घसरण, गुंतवणुकीसाठी तयार झाली संधी
Recommended image2
Maratha Reservation : मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना 3.40 कोटींची मदत मंजूर; सरकारचा मोठा निर्णय
Recommended image3
Vidhan Parishad Election 2026 : कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध; अनिकेत तटकरे यांचा विजय, पाच ठिकाणी महायुतीचे वर्चस्व
Recommended image4
Konkan Vidhan Parishad Election : कोकण विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट; ठाकरे गटाचे बाळ माने यांचा माघार अर्ज, निवडणूक बिनविरोध
Recommended image5
Car Accident | जळगावमध्ये कारने 8 जणांना उडवलं, 15 वर्षाचा अल्पवयीन ड्रायव्हर फरार
Related Stories
Recommended image1
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार साकार! म्हाडाची ५००० घरांसाठी बंपर लॉटरी; 'या' भागात मिळणार सुवर्णसंधी
Recommended image2
Maharashtra Weather : राज्यात उष्णतेची लाट; काही भागांत हलक्या पावसाची शक्यता
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved