- Home
- Utility News
- रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! तिकीट कॅन्सल करण्याचे नियम बदलले; आता खिशाला बसणार कात्री, पाहा काय आहेत नवे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! तिकीट कॅन्सल करण्याचे नियम बदलले; आता खिशाला बसणार कात्री, पाहा काय आहेत नवे बदल
Indian Railways Ticket Cancellation Rules: भारतीय रेल्वेने तिकीट रद्द करणे आणि रिफंड मिळवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत, जे १ एप्रिलपासून लागू होतील. नव्या नियमांनुसार, रेल्वे सुटण्याच्या वेळेनुसार कपातीची रक्कम ठरवली जाईल.

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! तिकीट कॅन्सल करण्याचे नियम बदलले
मुंबई: जर तुम्ही नियमित रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या प्रक्रियेत आणि रिफंडच्या नियमात मोठे फेरबदल केले आहेत. १ ते १५ एप्रिल दरम्यान हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होतील. जाणून घ्या, आता तिकीट रद्द केल्यावर तुमच्या हातात किती पैसे येतील.
तिकीट कॅन्सल केल्यास किती 'कट' होणार पैसे? (नवे नियम)
नव्या नियमांनुसार, रेल्वे सुटण्याच्या वेळेनुसार कपातीचे गणित बदलले आहे.
८ तासांपेक्षा कमी वेळ असल्यास: रेल्वे सुटण्यापूर्वी ८ तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ उरला असताना तिकीट रद्द केल्यास एकही रुपया रिफंड मिळणार नाही.
८ ते २४ तासांच्या दरम्यान: तिकीट रद्द केल्यास एकूण भाड्याच्या ५०% रक्कम कापली जाईल.
२४ ते ७२ तासांच्या दरम्यान: तिकीट रद्द केल्यास २५% रक्कम कपात होईल.
७२ तासांच्या आधी: तिकीट रद्द केल्यास जुन्या नियमांनुसार जो 'फ्लॅट चार्ज' होता, तेवढीच रक्कम कापली जाईल.
प्रवाशांसाठी काही 'गुड न्यूज' सुद्धा!
कॅन्सेलेशनचे नियम कडक झाले असले तरी, रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी काही डिजिटल बदलही केले आहेत.
बोर्डिंग स्टेशन बदलण्याची मुभा: आता तुम्ही ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत तुमचे बोर्डिंग स्टेशन (जिथून गाडी पकडणार आहात ते ठिकाण) बदलू शकता. ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय आहे.
कुठूनही तिकीट कॅन्सल करा: यापूर्वी ऑफलाइन तिकीट रद्द करण्यासाठी ठराविक स्टेशनवर जावे लागायचे, आता ही सुविधा अधिक लवचिक झाली असून तुम्ही कोणत्याही काउंटरवरून तिकीट रद्द करू शकता.
प्रवास श्रेणी (Class) बदलणे: प्रवासादरम्यान गरज भासल्यास तुम्ही तुमचा क्लास (उदा. स्लीपरवरून थर्ड एसी किंवा सेकंड एसी) अपडेट करू शकता.
प्रवास माहिती अपडेट: गाडी सुटण्यापूर्वी ३० मिनिटांपर्यंत तुम्ही तुमच्या प्रवासाचे तपशील डिजिटल पद्धतीने अपडेट करू शकाल.
जुने नियम काय होते? (तुलनेसाठी)
याआधी रेल्वे सुटण्याच्या ४८ तास आधी तिकीट रद्द केल्यास फक्त फ्लॅट चार्ज (उदा. AC साठी १८० रुपये + GST) कापला जायचा. १२ ते ४ तासांपूर्वी ५०% कपात व्हायची आणि ४ तासांनंतर रिफंड मिळत नसे. आता ही मर्यादा ८ तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
महत्त्वाची टीप
वेटिंग लिस्ट तिकीट चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म झाले नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच आपोआप रद्द होऊन पूर्ण रिफंड मिळेल. तसेच ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त उशीर असल्यास TDR भरून पूर्ण परतावा मिळवण्याची सुविधा कायम आहे.

