MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Mumbai To Nagpur Special Train: उन्हाळी सुट्टीत वेटिंगची कटकट मिटली! मुंबई, पुण्याहून नागपूरसाठी धावणार 'समर स्पेशल' ट्रेन; पाहा वेळापत्रक

Mumbai To Nagpur Special Train: उन्हाळी सुट्टीत वेटिंगची कटकट मिटली! मुंबई, पुण्याहून नागपूरसाठी धावणार 'समर स्पेशल' ट्रेन; पाहा वेळापत्रक

Mumbai To Nagpur Special Train: उन्हाळ्याच्या सुट्टीत गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई (LTT) व पुण्याहून नागपूरसाठी समर स्पेशल ट्रेन जाहीर केल्यात. या गाड्यांना जळगाव, भुसावळ येथे थांबे असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचीही सोय होणारय.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 24 2026, 04:12 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
मुंबई, पुण्याहून नागपूरसाठी धावणार 'समर स्पेशल' ट्रेन
Image Credit : Google

मुंबई, पुण्याहून नागपूरसाठी धावणार 'समर स्पेशल' ट्रेन

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या किंवा फिरण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेच्या 'वेटिंग लिस्ट'मुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांसाठी मुंबई (LTT) ते नागपूर आणि पुणे ते नागपूर या मार्गांवर विशेष फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ विभागात थांबे देण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचीही सोय होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
१) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - नागपूर विशेष गाडी
Image Credit : Asianet News

१) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - नागपूर विशेष गाडी

मुंबईकरांसाठी ही गाडी नागपूर प्रवासाचा उत्तम पर्याय ठरेल.

गाडी क्र. ०१०२१: ३ एप्रिल रोजी LTT वरून पहाटे १२:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:४५ वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. ०१०२२: ३ एप्रिल रोजी नागपूरवरून रात्री ८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता LTT ला पोहोचेल.

प्रमुख थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. 

Related Articles

Related image1
Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; मुंबई-ठाण्यात येलो अलर्ट, काही भागात अवकाळी पावसाचीही हजेरी
Related image2
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ; दोषींना सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
34
२) पुणे - नागपूर - पुणे 'सुपरफास्ट' विशेष गाडी
Image Credit : social media

२) पुणे - नागपूर - पुणे 'सुपरफास्ट' विशेष गाडी

पुण्यातील विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी नागपूरला जाण्यासाठी ही विशेष सोय करण्यात आली आहे.

गाडी क्र. ०१४६७: शुक्रवार, ३ एप्रिल रोजी पुणे स्थानकातून दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६:३० वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. ०१४६८: शनिवार, ४ एप्रिल रोजी नागपूरवरून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.

प्रमुख थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. 

44
प्रवाशांसाठी टीप
Image Credit : Social Media

प्रवाशांसाठी टीप

उन्हाळी सुट्ट्यांमुळे या गाड्यांचे बुकिंग लवकर फुल्ल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत रेल्वे संकेतस्थळावर जाऊन आपले आरक्षण त्वरित निश्चित करावे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या
पुण्याच्या बातम्या
विदर्भातील बातम्या

Recommended Stories
Recommended image1
CNG Price in Maharashtra : सीएनजी दरवाढीचा आणखी एक झटका! पुण्यात गॅस महागला, पेट्रोल-डिझेल पाठोपाठ वाहनचालकांची चिंता वाढली
Recommended image2
'राजा शिवाजी'साठी मुख्यमंत्र्यांचा फोन; रितेश देशमुख झाला भावूक
Recommended image3
जळगाव सराफा बाजारात मोठी घसरण, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
Recommended image4
राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘वादळ’; तटकरे नाराज, प्रफुल पटेल गैरहजर, पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
Recommended image5
दिल्लीत आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘मेगा बैठक’; कांदा, पाणी आणि एसटीच्या प्रश्नांवर होणार निर्णायक चर्चा
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर; मुंबई-ठाण्यात येलो अलर्ट, काही भागात अवकाळी पावसाचीही हजेरी
Recommended image2
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ; दोषींना सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved