MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Ration Card: रेशन कार्ड हरवलंय? टेंशन घेऊ नका! 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि घरबसल्या मिळवा दुसरं रेशन कार्ड

Ration Card: रेशन कार्ड हरवलंय? टेंशन घेऊ नका! 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि घरबसल्या मिळवा दुसरं रेशन कार्ड

Ration Card: रेशन कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आता घाबरण्याची गरज नाही. तुम्ही पोलीस ठाण्यात FIR नोंदवून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 05 2026, 06:10 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
रेशन कार्ड हरवलंय? टेंशन घेऊ नका! 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा
Image Credit : social media

रेशन कार्ड हरवलंय? टेंशन घेऊ नका! 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा

मुंबई: सर्वसामान्य नागरिकांसाठी रेशन कार्ड (Ration Card) हे केवळ स्वस्त धान्य मिळवण्याचे साधन नसून, ते एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा देखील आहे. सरकारी योजनांचा लाभ असो किंवा अत्यल्प दरात धान्य, रेशन कार्डाशिवाय अनेक कामे अडकून पडतात. पण, जर तुमचे हे महत्त्वाचे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले, तर आता घाबरण्याचे कारण नाही. शासनाने आता 'डुप्लिकेट रेशन कार्ड' मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत केली आहे. पाहा नक्की काय आहे ही A to Z प्रोसेस 

25
१. सर्वात आधी करा 'हे' काम (First Step)
Image Credit : X

१. सर्वात आधी करा 'हे' काम (First Step)

रेशन कार्ड हरवल्याचे समजताच सर्वात आधी तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन FIR (प्रथम माहिती अहवाल) नोंदवा. डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करताना या FIR ची प्रत जोडणे अनेक राज्यांमध्ये अनिवार्य आहे. ही प्रत तुमच्याकडे जपून ठेवा. 

Related Articles

Related image1
PM Kisan: २३ वा हप्ता हवाय? मग शेतकऱ्यांनो 'या' ३ गोष्टी तातडीने करा; अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
Related image2
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! एक्स्प्रेसवे होणार '१० पदरी'; पण प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ, वाचा काय आहे अपडेट
35
२. ऑफलाइन अर्ज कसा करायचा?
Image Credit : Gemini AI

२. ऑफलाइन अर्ज कसा करायचा?

जर तुम्हाला प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन काम करायचे असेल, तर खालील पद्धत वापरा

तुमच्या जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या (Tahsildar Office) कार्यालयात जा.

तेथून 'डुप्लिकेट रेशन कार्ड'साठीचा विहित नमुना अर्ज मिळवा.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरा.

आवश्यक कागदपत्रे: FIR ची प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो आणि रहिवासी पुरावा.

अर्जासोबत नाममात्र सरकारी शुल्क भरून तो जमा करा. काही दिवसांतच तुम्हाला नवीन कार्ड दिले जाईल. 

45
३. ऑनलाइन अर्जाची 'डिजिटल' सोय
Image Credit : our own

३. ऑनलाइन अर्जाची 'डिजिटल' सोय

आता लांबलचक रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याही अर्ज करू शकता.

तुमच्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) जा.

तेथे 'Apply for Duplicate Ration Card' हा पर्याय निवडा.

तुमचा रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर टाकून लॉगीन करा.

विचारलेली माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करा.

ऑनलाइन फी भरल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळेल, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती (Status) तपासू शकता. 

55
अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Image Credit : our own

अर्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

अर्जात दिलेली माहिती जुन्या रेशन कार्डावरील माहितीशी जुळणारी असावी.

आधार कार्ड लिंक असणे अर्जासाठी फायदेशीर ठरते.

डुप्लिकेट कार्ड मिळाल्यावर त्यावर 'Duplicate' असा उल्लेख असू शकतो, मात्र त्याचे मूल्य मूळ कार्डासारखेच असते. 

रेशन कार्ड हरवणे ही आता मोठी अडचण राहिलेली नाही. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पर्यायांमुळे नागरिक आता कोणत्याही त्रासाशिवाय आपले हक्काचे कार्ड पुन्हा मिळवू शकतात.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Cute Trays: स्नॅक्स किंवा मसाले ठेवण्यासाठी ६ क्युट ट्रे डिझाइन्स, खरेदी करा फक्त ४०० रुपयांत
Recommended image2
मराठवाड्यासाठी गुड न्यूज! उन्हाळी सुट्टीत 'दिल्लीवारी' झाली सोपी; नांदेड-संभाजीनगरमार्गे धावणार स्पेशल ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Recommended image3
PM Kisan: २३ वा हप्ता हवाय? मग शेतकऱ्यांनो 'या' ३ गोष्टी तातडीने करा; अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
Recommended image4
Bangle Craft: जुन्या तुटक्या बांगड्या फेकू नका, बनवा घरासाठी ५ सुंदर वस्तू!
Recommended image5
Onion Cutting: आता कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही, या सोप्या ट्रिक्स नक्की ट्राय करा!
Related Stories
Recommended image1
PM Kisan: २३ वा हप्ता हवाय? मग शेतकऱ्यांनो 'या' ३ गोष्टी तातडीने करा; अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत!
Recommended image2
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! एक्स्प्रेसवे होणार '१० पदरी'; पण प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ, वाचा काय आहे अपडेट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved