Health Tips: चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे आठ पदार्थ
Health Tips: एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा 'चांगले कोलेस्ट्रॉल' हृदयाच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. हार्वर्डच्या अभ्यासानुसार, एचडीएल कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे आठ पदार्थ
एचडीएल कोलेस्ट्रॉल किंवा 'चांगले कोलेस्ट्रॉल' हृदयाच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची संरक्षक भूमिका बजावते. हार्वर्डच्या अभ्यासानुसार, एचडीएल कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते.
चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ हृदयासाठी फायदेशीर.
निरोगी जीवनशैलीसोबतच चांगले कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या आठ पदार्थांबद्दल जाणून घेऊया...
अॅव्होकॅडो खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते
अॅव्होकॅडो हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असलेले पौष्टिक फळ आहे. फॅट्स व्यतिरिक्त, यात फायबर, पोटॅशियम आणि विविध अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
सॅल्मन, बांगडा यांसारखे फॅटी मासे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात
सॅल्मन आणि बांगडा यांसारखे फॅटी मासे ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे उत्तम स्रोत आहेत. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स एचडीएलची कार्यक्षमता सुधारतात आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास मदत करतात. ओमेगा-3 एचडीएलची कार्यक्षमता सुधारून रक्तप्रवाहातून एलडीएल कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करते.
नट्स खाल्ल्याने एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढते.
बदाम, अक्रोड यांसारख्या नट्समध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स तसेच फायबर भरपूर प्रमाणात असते. नियमितपणे नट्स खाल्ल्याने एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढण्यास आणि हृदयाशी संबंधित धोका कमी होण्यास मदत होते.
चिया सीड्स आणि जवसात अल्फा-लिनोलेनिक ॲसिड जास्त असते.
आहारात चिया सीड्स आणि जवस यांसारख्या बियांचा समावेश केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होऊन एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास मदत होते.
ऑलिव्ह ऑईल भूमध्यसागरीय आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे.
एक्स्ट्रा-व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये हृदयासाठी आरोग्यदायी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलीफेनॉल असतात. हे एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते आणि सूज कमी करते. आहारात सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी ऑलिव्ह ऑईल वापरल्याने केवळ चांगले कोलेस्ट्रॉल वाढत नाही, तर एकूण लिपिड प्रोफाइल सुधारते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो.
सोया प्रोटीनच्या नियमित सेवनाने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते
सोया उत्पादनांमध्ये उच्च-गुणवत्तेचे वनस्पती-आधारित प्रोटीन आणि आयसोफ्लेव्होन असतात. सोया प्रोटीनच्या नियमित सेवनाने एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी माफक प्रमाणात वाढते आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होते. रेड मीटऐवजी प्रोटीनचा स्रोत म्हणून सोयाचा समावेश केल्याने एचडीएलची पातळी तर वाढतेच, शिवाय वजन आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते.
ओट्सच्या नियमित सेवनाने हृदयाशी संबंधित धोका कमी होतो
ओट्स, बार्ली किंवा ब्राऊन राईस यांसारखी संपूर्ण धान्ये हृदयाचे संरक्षण करू शकतात. ओट्सच्या नियमित सेवनाने एकूण लिपिड प्रोफाइल सुधारतो आणि हृदयाशी संबंधित धोका कमी होतो.

