सार

Government Job : तुम्ही शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा जाणून घेऊया...

GMC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2024 : छत्रपती संभाजी नगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालायत नोकर भरती केली जाणार असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, टेक्निकल सपोर्ट-III आणि प्रोजेक्ट नसर्ग-III च्या पदावर नोकर भरती केलीजाणार आहे. या पदांसाठी एकूण 5 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण औरंबाद असणार आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेआधी अर्ज दाखल करावा असेही परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

  • पदाचे नाव – प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III आणि प्रोजेक्ट नर्स-III
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बालरोग ऑन्कोलॉजी विभाग, प्रभाग 1, शासन. कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.gmcaurangabad.com/

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नोकर भरती 2024

  • पदाचे नाव आणि रिक्त पदसंख्या पुढीलप्रमाणे-
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I रिक्त पद 01
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II रिक्त पद 02
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III रिक्त पद 01
  • प्रोजेक्ट नर्स-III रिक्त पद 01

शैक्षणिक पात्रता

  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I साठी 10 वी पास (MLT/DMLT/ITI) आणि कंप्युरचे ज्ञान आणि अनुभव
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II साठी 12 वी विज्ञान शाखेत उत्तीर्ण, डिप्लोमा (MLT/DMLT/Engineering) आणि कंप्युटरचे ज्ञान आणि अनुभव
  • प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III साठी बी.एससी. मध्ये पदवी/फार्माकॉलॉजी/कॉमर्स, इंजिनिअरिंग अथवा पीजी डिग्री आणि अनुभव
  • प्रोजेक्ट नर्स-III साठी 10 वी पास अथवा CGPA चौथ्या वर्षाचा नर्सिंग कोर्स, कंप्युटरचे ज्ञान

असा करा अर्ज

  • भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याची अखेरची तारीख 31 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी या PDF जाहिरातीवर क्लिक करा

आणखी वाचा : 

सोन्यामध्ये या 4 पद्धतीने गुंतवणूक केल्यास मिळू शकतो मोठा नफा, कर्जही मिळते

Budget 2024 : बजेटमध्ये तरुणांना खास भेट, थेट EPFO ​​खात्यात जमा होणार 15 हजार