सार

Investment in gold : सोन्यामध्ये गुंतवणूक करणे उत्तम पर्याय मानला जातो. याशिवाय सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास अनेक प्रकारचे फायदे मिळतात. यासाठी सोन्यात कोणत्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता आणि कुठे अधिक नफा मिळेल याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

4 Ways to Investment in Gold : भारतात बहुतांशजण आजही सोन्यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. सोन्यात गुंतवणूक केल्याने काही फायदे होतात. अशातच तुम्ही सोन्यात वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक केल्यास त्याच्या माध्यमातून मोठा नफा होण्याची शक्यता असते. सोन्यात गुंतवणूक करण्याचा मोठा फायदा असा होतो की, तुमचे पैसे अत्यंत सुरक्षित राहतात. याशिवाय गरज भासल्यास सोन्यावर कर्जही घेऊ शकता.

गेल्या काही वर्षांमध्ये सोन्यामध्ये गुंतवमूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. याशिवाय सोन्यावर हॉलमार्किंग असणेही बंधनकारक केले आहे. यावरुन सोन्याची शुद्धता नागरिकांना कळण्यास सोपे होण्यासह ते ट्रेसही करता येईल. जाणून घेऊया सोन्यात कोणत्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता याबद्दल सविस्तर...

गोल्ड ईटीएफ
तुम्ही शेअर्सप्रमाणे सोन्याची खरेदी करू शकता. या सुविधेला Gold ETF असे म्हटले जाते. यामध्ये एक्सचेंज-ट्रेडेड फंड असतात. जे स्टॉक एक्सचेंजसारखे खरेदी अथवा विक्री करता येतात. गोल्ड ईटीएफमध्ये सोने कमी किंमतीत खरेदी करता येते. यासाठी तुमचे ट्रेडिंग डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. यानंतरच तुम्ही गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.

सोन्याची खरेदी
तुम्ही सोन्यातही गुंतवणूक करू शकता. यामध्ये सोन्याची बिस्किटे, नाणी अथवा ज्वेलरी खरेदी करू शकता. काहीजण सोन्यात गुंतवणूक करणे उत्तम मानत नाहीत. कारण सोन्यावर घडणावळ आणि जीएसटी द्यावा लागतो. (Sonyamdhe guntavnuk kashi karu shkto)

पेमेंट अ‍ॅपच्या माध्यातून गुंतवणूक
पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहज गुंतवणूक करू शकता. यासाठी अधिक पैसेही खर्च करावे लागत नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोन्यात गुंतवणूक करू शकता. यासाठी गुगल पे, पेटीएम, फोन पे सारखे काही पेमेंट अ‍ॅप सोन्यात गुंतवणूक करण्याची सुविधा देतात.

सॉवरेन गोल्ड बॉण्ड
सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे सॉवरेन गोल्ड बॉण्ड आहे. ही सुविधा शासकीय असून सरकारकडून वेळोवेळी नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली जाते. याचे मूल्य रुपये अथवा डॉलरमध्ये नसते. तर सोन्याच्या वजनानुसार ठरते. जर बॉण्ड एक ग्रॅम सोन्याचा असल्यास त्याची किंमत एक ग्रॅम सोन्याप्रमाणे होते. सॉवेरन गोल्ड बॉण्डवर प्रत्येक वर्षाला 2.50 टक्क्यांनी निश्चित रुपात व्याज मिळते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीही तुमचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे.

आणखी वाचा : 

Budget 2024 : बजेटमध्ये महिलांना खास भेट, 3 लाख कोटी खर्च केले जाणार

Budget 2024 : नोकरीसह महिला व गरिबांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर