नर्सरीतून आणलेलं झाड काही दिवसांतच सुकतं का? जास्त पाणी देणे, चुकीच्या जागी ठेवणे आणि लगेच कुंडी बदलणे यासारख्या ५ सामान्य चुका टाळून तुमचं रोप कसं हिरवंगार ठेवायचं, हे जाणून घ्या.

आपण हौसेने नर्सरीमधून एखादं हिरवंगार रोप घरी आणतो, पण काही दिवसांतच ते सुकायला लागतं. असं फक्त तुमच्यासोबतच होतं असं नाही, अनेकांना हा अनुभव येतो. नर्सरीतून रोप आणणं सोपं असलं तरी, त्याला जगवणं एक आव्हानच असतं. काही छोट्या-छोट्या चुकांमुळे झाड सुकतं (Plant Drying Reasons). जर तुम्हाला तुमचं रोप नेहमी हिरवंगार हवं असेल, तर माळ्याने सांगितलेल्या या ५ चुका करणं टाळा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

लगेच कुंडी बदलण्याची घाई करू नका

रोप घरी आणल्यावर त्याला लगेच दुसऱ्या कुंडीत लावण्याची चूक करू नका. कमीत कमी ४ ते ५ दिवस थांबा. यामुळे रोपाला नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ मिळतो आणि नंतर कुंडी बदलल्यावर त्याला धक्का बसत नाही.

View post on Instagram

गरजेपेक्षा जास्त पाणी देणे

जर तुम्ही घरात नवीन रोप लावत असाल, तर त्याला सारखं-सारखं पाणी देणं टाळा. जेव्हा कुंडीतली माती वरून कोरडी वाटेल, तेव्हाच पाणी द्या. जास्त पाण्यामुळे झाडाची मुळं सडतात आणि झाड सुकतं.

योग्य प्रकाशात रोप न ठेवणे

जेव्हाही तुम्ही एखादं रोप लावता, तेव्हा त्याला किती ऊन किंवा सावली लागते, याची माहिती माळ्याकडून नक्की घ्या. अनेकदा योग्य प्रकाश न मिळाल्यानेही झाडं लवकर खराब होतात. काही रोपांना जास्त ऊन लागतं, तर काहींना सावली. जर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली, तर रोप लावल्यानंतर ते सुकणार नाही.

जास्त खत घालणे

जेव्हा तुम्ही नर्सरीतून रोप विकत घेता, तेव्हा माळी खतही देतो. पण जास्त खत घातल्याने रोपाची वाढ चांगली होईल, असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. नवीन रोप आधीच पोषक तत्व असलेल्या मातीत लावलेलं असतं. जर तुम्ही कुंडी बदलल्यानंतर लगेच खत टाकलं, तर ते जळू शकतं. त्यामुळे कमीत कमी २ ते ३ आठवडे थांबून मगच खत घाला.

तापमानातील अचानक बदल

जेव्हा तुम्ही नर्सरीतून रोप घरी आणता, तेव्हा त्याला अचानक कडक उन्हात किंवा पूर्ण सावलीत ठेवू नका. नर्सरीमध्ये जसं वातावरण होतं, तसंच वातावरण घरी देण्याचा प्रयत्न करा आणि मगच रोप लावा.