180 देशांमध्ये बंद होणार Google Pay सुविधा, नक्की कारण काय?

| Published : May 21 2024, 07:00 AM IST

Google Pay service

सार

Tech News : गुगल पे अमेरिकेसह 180 देशांमध्ये आपली सुविधा बंद करणार आहे. यामुळे युजर्सला ऑनलाइन पेमेंट स्विकारणे किंवा एखाद्याला करणे शक्य होणार नाहीये. अशातच युजर्सला गुगल वॉलेटवर शिफ्ट होण्यास सांगितले आहे.

Tech News : भारतात 8 मे ला गगुल वॉलेट (Google Wallet) लाँच झाले होते. अशातच गुगल पे (Google Pay) बंद होणार आहे. भारतासह जगभरात ऑनलाइन पेमेंटसाठी गुगल पे चा वापर केला जात आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये गुगल वॉलेट आल्यानंतर गुगल पे युजर्समध्ये वाढ झाली आहे. गुगलने घोषणा केलीय की, 4 जून पासून गुगल पे बंद करणार आहे. खरंतर, 180 देशांमध्ये सुविधा बंद केली जाणार आहे.

अमेरिकेसह 180 देशांमध्ये बंद होणार गुगल पे
गुगल पे अमेरिकेसह 180 देशांमध्ये आपली सुविधा बंद करणार आहे. यानंतर युजर्सला ऑनलाइन पेमेंट रिसिव्ह किंवा पाठवता येणार नाही. गुगलने अमेरिकेतील (US) युजरला म्हटले आहे की, त्यांनी गुगल वॉलेटवर शिफ्ट व्हावे. काही जाणकरांचे असे मानणे आहे की, गुगल वॉलेटला प्रमोट करण्यासाठी असे पाऊल उचलले जात आहे. म्हणजेच गुगल पे नव्हे गुगल वॉलेट वापरले जाणार आहे.

केवळ या देशांमध्ये गुगल पे सर्विसची सुविधा
गुगल पे ची सुविधा जगभरातील 180 देशांमध्ये बंद होणार आहे. पण भारत (India) आणि सिंगापुरमध्ये (Singapore) गुगल पे सुविधा सुरू राहणार आहे. म्हणजेच, या देशातील युजर्सला चिंता करण्याची गरज नाही. भारतात गुगल पे चे मोठे मार्केट आहे. याशिवाय फिनटेक कंपन्यांमध्ये सर्वाधिक पुढे आहे. अशात गुगल पे सुविधा भारतात कायम सुरू राहणार आहे. कंपनीने म्हटले आहे की, गुगल वॉलेट लाँच झाल्यास गुगल पे वर कोणताही परिणाम होणार नाही.

गुगल वॉलेट आणि गुगल पे मध्ये फरक काय?
गुगल वॉलेट एक सुरक्षित आणि खासगी डिजिटल वॉलेट आहे. यामध्ये युजर्सला अ‍ॅपमध्ये लिंक केलेले पेमेंट कार्ड, तिकिट, पास आणि आयडी अगदी सुरक्षितपणे सेव्ह करून ठेवता येतात. दुसऱ्या बाजूला गुगल पे युजर्सला डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा देते. यामुळे युजर्सला आपल्या मित्रपरिवाराला युपीआय (UPI) किंवा मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून थेट पेमेंट करता येते. याशिवाय दुकानदारांना त्यांच्याकडील क्यूआर कोडने पेमेंट करू शकता.

आणखी वाचा : 

मुकेश अंबानींच्या Jio Rail App वर मिळणार कंन्फर्म तिकीट, फॉलो करा या स्टेप्स

या कंपनीने लाँच केला सर्वाधिक स्वस्त रिचार्ज, किंमत केवळ 1 रुपये