Jio Rail App युजर्सला काही सुविधांचा लाभ घेता येतो. यापैकी काही युजर्सला स्पेशल सुविधा दिल्या जातात. पण खास गोष्ट अशी की, यामध्ये रेल्वेचे कंन्फर्म तिकीट बुकिंग करण्याची सुविधा मिळते.
टेलिकॉम कंपनी जिओने अवघ्या कमी काळात युजर्सचे एक मोठे नेटवर्क तयार केले आहे. जिओ सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्यासाठी प्रयत्न करतेय. अशातच कंपनीने वर्ष 2019 मध्ये जिओ रेल अॅप लाँच केला होता. या अॅपच्या मदतीने युजर्सला ट्रेनची तिकीट बुक करता येणार आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

केवळ जिओ युजर्ससाठी सुविधा
जिओ रेल अॅप केवळ जिओ फोन युजर्ससाठी वापर करू शकता. यामध्ये युजर्सला काही स्पेशल सुविधा मिळतात. खास गोष्ट अशी की, यामध्ये युजरला कंन्फर्म तिकीट बुकिंगची सुविधा मिळते. याशिवाय युजरला PNR स्टेटसपर्यंतची सुविधा मिळते. कंपनीने अॅपसाठी आयआरसीटीसी सोबत करार केला आहे.
असे बुकिंग करा तिकीट
- सर्वप्रथम जिओ फोनमध्ये अॅप डाउनलोड करावा लागेल.
- अॅप सुरू करा.
- ज्या स्थानकापासून ते उतरण्याच्या स्थानकापर्यंतची माहिती द्यावी लागेल.
- तारखेची निवड करा.
- तुमच्या सुविधेनुसार सीट निवडा.
- डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने पेमेंट करू शकता.
- अखेर तिकीट कंन्फर्म होईल.
- तिकीट रद्द करण्याचाही पर्याय
- जिओ रेल अॅपच्या मदतीने तिकीट बुकिंग करू शकता. यामधील सर्व माहिती फोनवर सहज मिळेल. या अॅपच्या मदतीने तिकीट रद्द करू शकता.
आणखी वाचा :
या कंपनीने लाँच केला सर्वाधिक स्वस्त रिचार्ज, किंमत केवळ 1 रुपये
