Ghee Benefits : कोणत्याही क्रीमची गरज नाही, तुपाने करा चेहऱ्याला मसाज, भन्नाट फायदे
Ghee: आयुर्वेदात तुपाला खूप महत्त्व आहे. तूप खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्वे मिळतात. तसेच, चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

देशी तूप एक अमृत
आयुर्वेदात तुपाला अमृत मानले जाते. कारण ते शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करते. त्यात भरपूर पोषक तत्वे असतात. रोज एक चमचा तूप खाल्ल्याने शरीर आणि मनाला अनेक फायदे होतात. आयुष मंत्रालयानुसार, तूप आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे.
तुपामधील पोषक तत्वे
आयुर्वेदानुसार, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तूप सेवन केल्यास ते अमृतासमान आहे. यामुळे हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच, त्वचेला चमकदार बनवण्याची शक्तीही त्यात आहे. तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असतात.
तुपाने मसाज
आजकालच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि चिंता वाढली आहे. याचा परिणाम त्वचेवर दिसतो. रोज अर्धा चमचा तूप घेऊन चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचेला खोलवर पोषण मिळते. यामुळे कोरडी त्वचा, सुरकुत्या आणि डाग कमी होतात.
कितीतरी फायदे!
तुपाने नियमित मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. व्हिटॅमिन ए आणि ई अँटी-एजिंग म्हणून काम करतात. हिवाळ्यात त्वचा फुटण्यापासून तूप संरक्षण करते. तेलकट त्वचा असलेल्यांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच मसाज करावा.

