सार

भारतात वर्ष 2000 नंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारावर निदान करणे शक्य झाले आहे. वैज्ञानिकांना ब्रेस्ट कॅन्सरवर एक औषध तयार केले आहे. 

जगभरात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढत आहे. भारतात प्रत्येक वर्षी ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. अशातच वैज्ञानिकांनी एक सिंगल डोसच्या मदतीने ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्यूमरला संपण्याचा दावा केला आहे. या एका डोसमुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या आजारावर उपचार करणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील अर्बाना शॅम्पेनमध्ये इलिनोइस युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी ईआरएसओ-टीएफपीवाय नावाच्या मोलिक्यूलचा एक डोस तयार केला आहे. यामुळे ट्यूमर बरा होण्यास मदत मिळाली आहे.

अभ्यासाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर पॉल हर्गेनरोथर यांनी म्हटले की, ब्रेस्ट कॅन्सरच्या माउस मॉडेलमध्ये ट्यूमरला सिंगल डोसच्या मदतीने संपवण्यात यश आले आहे. याशिवाय आकाराने मोठ्या झालेल्या ट्युमरलाही लहान करण्यास मदत मिळाली आहे. सध्या अध्ययन उंदरांवर करण्यात आले आहे. प्रोफेसर हर्गेनरोथर यांच्या मते, ब्रेस्ट कॅन्सरमधील 70 टक्के रुग्णांना सर्वसामान्यपणे सर्जरी करावी लागते. यानंतर वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून 5 ते 10 वर्षांपर्यंत उपचार केले जातात.

दीर्घकाळापर्यंत हार्मोन थेरपी घेतल्याने शरिरात ब्लड क्लॉट, स्नायूंचे दुखणे याची समस्या वाढली जाते. यामुळे रुग्णाला खूप त्रास सहन करावा लागू शकतो. अभ्यासातून समोर आले आहे की, अशा समस्येच्या कारणास्तव 20-30 टक्के रुग्ण उपाचार घेणे बंद करतात. अशातच सिंगल डोस ब्रेस्ट कॅन्सरवर फायदेशीर ठरू शकतो. अद्याप सिंगल डोससंदर्भात अधिक संशोधन केले जाणार आहे.

उंदरांमध्ये व्यक्तीच्या ट्यूमरचा वापर

वैज्ञानिकांच्या मते, सर्वप्रथम वर्ष 2021 मध्ये एक रेणू तयार करण्यात आला होता. याला ईआरएसओ नाव देण्यात आले होते. या सिंगल डोसमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे सेल्स संपण्यात मदत करू होऊ शकते. पण याचे काही दुष्परिणामही होते. अशातच तीन वर्षांमध्ये काही बदल करण्यात आले. ईआरएसओ-टीएफपीवाय नावाचा एक दुसरा सिंगल डोस विकसित करण्यात आला. लॅबमध्ये उंदरांमध्ये व्यक्तीमधील ट्यूमर घालण्यात आला. यानंतर उंदरांवप सिंगल डोसचे ट्रायल करण्यात आले. यामध्ये समोर आले की, हा सिंगल डोस ट्यूमरला संपवत आहे. ईआरएसओ-टीएफपीवायची एक लस उंदरांमध्ये वाढणारे लहान ट्यूमर संपवत असल्याचे दिसून आले. याशिवाय आकाराने मोठे असलेले ट्युमर लहान झाल्याचे दिसले.

या संशोधनातून स्पष्ट झाले की, सिंगल डोस ब्रेस्ट कॅन्सरचे ट्यूमर संपण्यात यशस्वी होत आहे. अशातच व्यक्तींवर सिंगल डोसचा सकारात्मक परिणाम झाल्यास याचा ब्रेस्ट कॅन्सरच्या उपाचारासाठी वापर करता येईल. जेणेकरुन वेगवेगळ्या थेरपी घेण्याची गरज भासणार नाही.

भारतात दरवर्षी वाढतोय रुग्णांचा आकडा

वर्ष 2000 नंतर भारतात ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. वर्ष 2021 मध्ये जवळजवळ ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण 1.5 दशलक्षांपर्यंत पोहोचले होते, जे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 1 टक्के आहे. देशातील वेगवेगळ्या संस्थेमधील संशोधकांनी ARIMA मॉडलचा वापर करत ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांच्या आकडेवारीचा अंदाज लावत म्हटले होते की, भारतात याचे रुग्ण वेगाने वाढतायत. वर्ष 2021 ते 2030 दरम्यान ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांचा आकडा वर्षाला 0.5 दशलक्षाने वाढण्याची शक्यता आहे. खरंतर, बिघडलेल्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. सध्या वर्ष 25-30 वयोगटातील महिलांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करावा लागत आहेत.

आणखी वाचा : 

दिवसातून किती वेळा चहा प्यावा, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो दुष्परिणाम

वजन कमी करण्यासाठी कोणता ब्रेकफास्ट करायला हवा, पर्याय जाणून घ्या