- Home
- Utility News
- SBI SCO Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विना परीक्षा SBI मध्ये मेगाभरती; अर्ज कसा कराल?
SBI SCO Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विना परीक्षा SBI मध्ये मेगाभरती; अर्ज कसा कराल?
SBI SCO Bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी तब्बल 996 जागांची मेगाभरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

विना परीक्षा SBI मध्ये मेगाभरती
SBI SCO Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी संधी खुली केली आहे. SBI कडून स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदासाठी तब्बल 996 जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांसाठी २ डिसेंबर २०२५ पासून अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
SBI कडून मोठी घोषणा, जवळपास हजार जागा रिक्त
SBI ने जाहीर केलेल्या मेगाभरतीत विविध पदांचा समावेश असून उमेदवारांनी त्यांच्या वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचा आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की, अर्ज करण्याआधी सर्व निकष व्यवस्थित वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया कालावधी
सुरुवात: 2 डिसेंबर 2025
अखेरची तारीख: 23 डिसेंबर 2025
अर्ज व शुल्क भरण्याची शेवटची तारीख एकच आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा? – 3 पदांवर 996 भरती
SBI ने तीन प्रमुख पदांसाठी एकूण 996 भरती जाहीर केल्या आहेत.
पद जागा वयोमर्यादा
VP Wealth (SRM) 506 26 ते 42 वर्षे
AVP Wealth (RM) 206 23 ते 35 वर्षे
Customer Relationship Executive 284 20 ते 35 वर्षे
वयोमर्यादा १ मे २०२५ रोजीच्या स्थितीनुसार लागू असेल.
अर्ज फी, कोणाला किती?
General / OBC / EWS: ₹750
SC / ST / PwD: अर्ज फी नाही (सूट)
शुल्क फक्त ऑनलाइन SBI च्या अधिकृत पेमेंट गेटवेमधून भरायचे आहे.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड खालील टप्प्यांत केली जाईल.
शॉर्टलिस्टिंग (पात्रतेनुसार)
मुलाखत परीक्षा
कागदपत्रांची पडताळणी
वैद्यकीय तपासणी
सर्व टप्पे पार केलेल्या उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती मिळणार आहे.

