- Home
- Maharashtra
- नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
Konkan Railway Special Trains 2025 : ख्रिसमस नववर्षाच्या सुट्ट्यांत गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे, कोकण रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान मुंबईहून कोकण, गोवा, कर्नाटक, केरळसाठी 3 मार्गांवर विशेष गाड्या धावणारय

सुट्टीत कोकण प्रवास? रेल्वेची खास घोषणा
हिवाळा, ख्रिसमस आणि नववर्षाचा हंगाम सुरू होताच कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड वाढते. ही वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा दिलासा देत विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत तीन गजबजलेल्या मार्गांवर 22 डब्यांच्या विशेष गाड्या धावणार आहेत. यात AC, स्लिपर आणि जनरल असे सर्व प्रकारचे डबे उपलब्ध असल्यामुळे प्रवास आणखी सोयीचा होणार आहे.
होलिडे सीझनसाठी रेल्वेची खास भेट
मुंबई CSMT–करमाळी डेली स्पेशल (01151/01152)
प्रवाशांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली ही विशेष गाडी 19 डिसेंबर ते 5 जानेवारी 2026 दरम्यान दररोज धावणार आहे.
मुंबई CSMT प्रस्थान: रात्री 12.20
करमाळी आगमन: दुपारी 1.30
परतीची गाडी: करमाळी 2.15 - मुंबई आगमन पुढील दिवशी पहाटे 3.45
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम.
एलटीटी–तिरुवनंतपुरम उत्तर साप्ताहिक स्पेशल (01171/01172)
महाराष्ट्र ते केरळ दरम्यानची वाढती मागणी ध्यानात घेऊन ही साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे.
प्रस्थान: 18, 25 डिसेंबर आणि 1, 8 जानेवारी – संध्या. 4 वाजता
तिरुवनंतपुरम आगमन: पुढील दिवशी रात्री 11.30
थांबे: कोकण आणि केरळमधील 40+ स्थानकांवर थांबा
दक्षिणेकडे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही गाडी मोठी सोय ठरणार आहे.
एलटीटी–मंगळुरू साप्ताहिक स्पेशल (01185/01186)
मंगळुरू व किनारपट्टीच्या भागाकडे जाणाऱ्यांसाठीही रेल्वेची खास व्यवस्था.
प्रस्थान (एलटीटी): 16, 23, 30 डिसेंबर आणि 6 जानेवारी – संध्या. 4 वाजता
मंगळुरू आगमन: पुढील दिवशी सकाळी 10.05
परतीच्या गाड्या: 17, 24, 31 डिसेंबर आणि 7 जानेवारी – दुपारी 1 वाजता
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडुपी, सुरतकल.
नववर्ष, सुट्ट्या आणि प्रवास, आता अधिक सहज!
या विशेष गाड्यांमुळे मुंबई, कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना आरामदायी आणि वेळेवर प्रवासाचा मोठा लाभ मिळणार आहे. सुट्टीच्या काळात तिकीटांसाठी होणारी धावपळ कमी होऊन प्रवास अधिक सुखकर होणार आहे.
