मे महिन्यात महाराष्ट्र दिन, साप्ताहिक सुट्ट्या आणि इतर सणांमुळे बँकांना तब्बल 13 दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेच्या शाखेत जाऊन करायची कामे वेळेत पूर्ण करावी, अन्यथा ऐनवेळी अडचण येऊ शकते. तथापि, नेट बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहणार आहेत.

एप्रिल महिना संपत आला असून आता मे महिन्याची सुरुवात होणार आहे. नव्या महिन्यात अनेक जण बँकेची कामे उरकण्याचे नियोजन करत असतात. मात्र मे महिन्यात बँकांना तब्बल 13 दिवस सुट्टी असल्याने ग्राहकांनी आधीच तयारी करणे आवश्यक ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार या महिन्यात साप्ताहिक सुट्ट्या, दुसरा-चौथा शनिवार तसेच विविध सण-उत्सवांमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे शाखेत जाऊन करायची कामे वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कधी सुट्टी असणार? 

मे महिन्यात 1, 3, 9, 10, 16, 17, 23, 24, 26, 27, 28 आणि 31 मे या दिवशी विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील. काही सुट्ट्या देशभर लागू असतील, तर काही सुट्ट्या राज्यनिहाय असतील. त्यामुळे आपल्या राज्यातील सुट्टीची माहिती तपासणे गरजेचे आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त अनेक राज्यांत बँका बंद राहतील. तर 27 आणि 28 मे रोजी काही राज्यांमध्ये विशेष प्रादेशिक सुट्ट्यांमुळे बँकिंग सेवा ठप्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे व्यवहार पुढे ढकलू नयेत, असा सल्ला दिला जात आहे.

डिजिटल माध्यमातून करा व्यवहार 

दरम्यान, बँका बंद असल्या तरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा सुरू राहणार आहेत. ग्राहकांना तातडीचे व्यवहार डिजिटल माध्यमातून करता येणार असल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे. मे महिन्यातील सुट्ट्यांची यादी लक्षात घेऊनच बँकिंग कामांचे नियोजन करावे, अन्यथा ऐनवेळी अडचण निर्माण होऊ शकते. विशेषतः चेक क्लिअरन्स, कर्ज व्यवहार, खाते अपडेट आणि शाखेत जाऊन होणारी कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे.