MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • बँक अलर्ट! एप्रिल महिन्यात 'या' १०+ दिवशी बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

बँक अलर्ट! एप्रिल महिन्यात 'या' १०+ दिवशी बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

April Month Bank Holiday List: एप्रिल महिन्यात सण-उत्सव आणि सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका १० पेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये गुड फ्रायडे, डॉ. आंबेडकर जयंती यांचा समावेश आहे, त्यामुळे ग्राहकांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावीत.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 29 2026, 04:53 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
बँक अलर्ट! एप्रिल महिन्यात 'या' १०+ दिवशी बँका राहणार बंद
Image Credit : Getty

बँक अलर्ट! एप्रिल महिन्यात 'या' १०+ दिवशी बँका राहणार बंद

मुंबई: नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणजेच एप्रिल महिना आता अवघ्या दोन दिवसांवर आहे. एप्रिलमध्ये सण-उत्सव आणि सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका अनेक दिवस बंद राहणार आहेत. जर तुमची बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे प्रलंबित असतील, तर घराबाहेर पडण्यापूर्वी ही 'बँक हॉलिडे लिस्ट' नक्की तपासा, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही.

24
एप्रिल २०२६ मधील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक
Image Credit : X

एप्रिल २०२६ मधील बँक सुट्ट्यांचे वेळापत्रक

एप्रिल महिन्याची सुरुवातच सुट्टीने होत असून, संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये खालीलप्रमाणे बँका बंद राहतील.

१ एप्रिल (बुधवार): बँकांचे वार्षिक खाते क्लोजिंग (नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात).

२ एप्रिल (गुरुवार): माउंडी थर्सडे (प्रामुख्याने केरळ आणि दक्षिण भारतात सुट्टी).

३ एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे (देशभरातील बँका बंद).

५ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी.

११ एप्रिल (शनिवार): महिन्याचा दुसरा शनिवार.

१२ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी.

१४ एप्रिल (मंगळवार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी आणि तमिळ नववर्ष (देशभरात सुट्टी).

१५ एप्रिल (बुधवार): हिमाचल दिन आणि बंगाली नववर्ष (विशिष्ट राज्यांत सुट्टी).

१९ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी.

२० एप्रिल (सोमवार): अक्षय तृतीया आणि बसव जयंती (अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी).

२५ एप्रिल (शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार.

२६ एप्रिल (रविवार): साप्ताहिक सुट्टी. 

Related Articles

Related image1
Home Decor: लाकडी हँगिंग लाइट्सचे 7 प्रकार, घराला द्या मॉडर्न आणि स्टायलिश लुक!
Related image2
Jio Fiber Bumper Offer: 3 महिन्यांच्या रिचार्जवर 1 महिना फ्री! फक्त 555 रुपयांत
34
महत्त्वाच्या टिप्स
Image Credit : FREEPIK

महत्त्वाच्या टिप्स

लाँग विकेंडची संधी: ३ एप्रिलला गुड फ्रायडेची सुट्टी असल्याने सलग तीन दिवस (शुक्रवार, शनिवार, रविवार) बँका बंद राहू शकतात. त्यामुळे तुमचे व्यवहार आधीच पूर्ण करा. 

44
बँका बंद असल्या तरी 'या' सेवा सुरू राहतील
Image Credit : Social media

बँका बंद असल्या तरी 'या' सेवा सुरू राहतील

बँकेच्या शाखा प्रत्यक्ष बंद असल्या, तरी ग्राहकांसाठी खालील डिजिटल सेवा २४x७ सुरू राहतील.

नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग: ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

ATM सेवा: रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम नेहमीप्रमाणे सुरू असतील.

UPI सेवा: गुगल पे, फोन पे किंवा इतर UPI ॲप्सद्वारे व्यवहार सुरळीत सुरू राहतील.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pink Pajeb: चांदीच्या पैंजणांना द्या गुलाबी ट्विस्ट, खरेदी करा स्टोन वर्क असलेल्या लेटेस्ट डिझाइन्स
Recommended image2
Kulhad Planter Idea: चहाचे कुल्हड फेकून देताय? थांबा! त्यापासून बनवा घरासाठी सुंदर कुंड्या
Recommended image3
Home Decor: लाकडी हँगिंग लाइट्सचे 7 प्रकार, घराला द्या मॉडर्न आणि स्टायलिश लुक!
Recommended image4
Gardening Tips: एकही रुपया न खर्च करता घरच्या घरी फुलवा बाग, या आहेत झिरो बजेट आयडिया!
Recommended image5
Cooling Plants: घरात लावा ही 6 झाडं, खोलीतलं तापमान येईल नियंत्रणात, AC चं बिलही येईल अर्धं!
Related Stories
Recommended image1
Home Decor: लाकडी हँगिंग लाइट्सचे 7 प्रकार, घराला द्या मॉडर्न आणि स्टायलिश लुक!
Recommended image2
Jio Fiber Bumper Offer: 3 महिन्यांच्या रिचार्जवर 1 महिना फ्री! फक्त 555 रुपयांत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved