Jio Fiber Bumper Offer: 3 महिन्यांच्या रिचार्जवर 1 महिना फ्री! फक्त 555 रुपयांत
Jio Fiber Bumper Offer: रिलायन्स जिओने आपल्या होम ब्रॉडबँड युझर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, तीन महिन्यांचा रिचार्ज केल्यास, एक महिन्याची सर्व्हिस पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
15

Image Credit : Google
जिओचा रु. 555 प्लॅन
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन ब्रॉडबँड ऑफर जाहीर केली आहे. ही खास ऑफर 'जिओ होम ब्रॉडबँड' प्लॅन्सवर उपलब्ध आहे. यात तीन महिन्यांच्या रिचार्जवर एक महिना सर्व्हिस मोफत मिळेल. म्हणजेच, तीन महिन्यांच्या पैशात तुम्ही चार महिने इंटरनेट वापरू शकाल.
25
Image Credit : Google
जिओ होम ब्रॉडबँड
जिओ होम ब्रॉडबँड म्हणजे फक्त इंटरनेट कनेक्शन नाही, तर हा एक कम्प्लीट डिजिटल अनुभव देणारा प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला ब्रॉडबँड इंटरनेटसोबत लाईव्ह टीव्ही चॅनल्स, अनेक ओटीटी ॲप्स आणि मनोरंजनाचे इतर पर्याय एकाच प्लॅनमध्ये मिळतात.
35
Image Credit : our own
जिओ फायबर
या ऑफरअंतर्गत, कंपनीने 555 रुपयांचा बेसिक प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना महिन्याला 1000GB डेटा, 30 Mbps स्पीड, 800 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनल्स आणि 10 ते 12 ओटीटी ॲप्सचं सबस्क्रिप्शन मिळतं. यामुळे कमी किमतीत जास्त फायदे मिळतात.
45
Image Credit : our own
जिओचे इतर प्लॅन्स
ज्यांना जास्त स्पीड हवा आहे, त्यांच्यासाठी 833 रुपये आणि 1111 रुपयांचे दोन प्लॅन्स आहेत. 833 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह 1000GB डेटा, कॉलिंग सुविधा आणि ओटीटी सेवा मिळतात. तर 1111 रुपयांच्या प्लॅनमध्ये याच स्पीडसोबत 16 ओटीटी ॲप्सचं सबस्क्रिप्शन मिळतं.
55
Image Credit : our own
तीन महिन्यांच्या रिचार्जवर एक महिन्याची अतिरिक्त व्हॅलिडिटी
या सर्व प्लॅन्सवर तीन महिन्यांचा रिचार्ज केल्यास एक महिन्याची अतिरिक्त व्हॅलिडिटी दिली जात आहे. काम, अभ्यास आणि मनोरंजन अशा सगळ्या गरजांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जिओ ब्रॉडबँड घरबसल्या एक कम्प्लीट डिजिटल अनुभव देतो.

