MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Metro Line 5 Update: प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपणार; ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो कधी सुरू होणार? तारीख समोर

Metro Line 5 Update: प्रवाशांची प्रतीक्षा अखेर संपणार; ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो कधी सुरू होणार? तारीख समोर

Metro Line 5 Update: ठाणे-भिवंडी-कल्याण परिसरातील नागरिकांसाठी मेट्रो लाईन 5 बाबत एक दिलासादायक बातमी आहे. एमएमआरडीएने या मार्गावरील पहिला टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या दिशेने कामाला वेग आला आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 09 2026, 06:17 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो कधी सुरू होणार? तारीख समोर
Image Credit : Getty

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो कधी सुरू होणार? तारीख समोर

कल्याण : मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारत असताना, ठाणे-भिवंडी-कल्याण परिसरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या मेट्रो लाईन 5 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली असून, लवकरच प्रवाशांना मेट्रो प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. 

27
कल्याण-भिवंडीकरांचे स्वप्न लवकरच साकार
Image Credit : ANI

कल्याण-भिवंडीकरांचे स्वप्न लवकरच साकार

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेवरील पहिला टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट एमएमआरडीएने निश्चित केले आहे. या दिशेने कामाचा वेग वाढवण्यात आला असून, भिवंडी शहराला पहिल्यांदाच मेट्रोची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या भागातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
शिवनेरी-शिवशाहीनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ बस; एसटीचा ऐतिहासिक निर्णय, जाणून घ्या कधीपासून धावणार
Related image2
पुणे-मुंबईपासून जवळच या ठिकाणी साजरा करा Valentine Day, प्रेमाला चढेल गुलाबी रंग
37
मेट्रो 5 मार्गिका कशी असेल?
Image Credit : X

मेट्रो 5 मार्गिका कशी असेल?

मेट्रो लाईन 5 ही एकूण 24.45 किलोमीटर लांबीची असून, या संपूर्ण मार्गावर 17 स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे 8,416 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएने हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका असा 12.20 किमी लांबीचा मार्ग सुरू करण्यात येणार असून, यामध्ये 7 स्थानकांचा समावेश असेल. 

47
कामे अंतिम टप्प्यात
Image Credit : X

कामे अंतिम टप्प्यात

पहिल्या टप्प्यातील स्थापत्य कामे सुमारे 97 टक्के पूर्ण झाली आहेत. कापूरबावडी येथील एका खांबाचे काम काही काळ रखडले होते. एका राजकीय नेत्याच्या विरोधामुळे जाहिरात फलक हटवण्यास अडचणी आल्या, तसेच मेट्रो मार्गिकेच्या आड येणारी एक इमारत अडथळा ठरत होती. मात्र आता जाहिरात फलक हटवण्यात आला असून, सर्व अडथळे दूर झाले आहेत. उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जाणार आहेत.

57
चाचणी फेऱ्या कधी?
Image Credit : X

चाचणी फेऱ्या कधी?

मेट्रो मार्गावर आवश्यक विद्युत व यांत्रिक प्रणाली बसवण्याचे काम सुरू होणार असून, त्यानंतर सप्टेंबर 2026 पर्यंत मेट्रोच्या चाचणी फेऱ्या सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. कारशेडचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार नसल्याने, सुरुवातीला मेट्रो गाड्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी तात्पुरत्या स्टॅबलिंग ट्रॅकचा वापर करून सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे.

67
कशेळी येथे उभारले जाणार कारशेड
Image Credit : X

कशेळी येथे उभारले जाणार कारशेड

मेट्रो 5 साठी कशेळी येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. ही जागा दलदलीची असल्याने भराव टाकून ती बांधकामयोग्य करावी लागणार आहे. या प्रक्रियेस सुमारे 6 महिने लागणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कारशेडचे काम सुरू होईल. संपूर्ण कारशेड तयार होण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

77
22 मेट्रो गाड्यांसाठी मोठे कंत्राट
Image Credit : X

22 मेट्रो गाड्यांसाठी मोठे कंत्राट

दरम्यान, मेट्रो लाईन 5 साठी 22 मेट्रो गाड्या खरेदी करण्यासाठी ऑक्टोबर 2025 मध्ये टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीला 2,481 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटांतर्गत रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग व टेलिकॉम यंत्रणा, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे तसेच डेपो प्लांट मशिनरी पुरवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे असणार आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण परिसरातील लाखो प्रवाशांसाठी मेट्रो लाईन 5 हा प्रकल्प दैनंदिन प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारा ठरणार असून, अखेर प्रतीक्षेचा शेवट जवळ आला आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
१ ग्रॅम सोन्यात करा टॉप्स खरेदी, पाहूनच बायको पडेल गळ्यात
Recommended image2
Best Camera Phones : फोटोला द्या प्रीमियम लूक; हे आहेत 30 हजारांखालील 5 बेस्ट कॅमेरा फोन्स, जबरदस्त फिचर्स
Recommended image3
Maruti Suzuki S Presso : मारुती सुझुकी एस-प्रेसोवर अविश्वसनीय ऑफर, आताच वाचा
Recommended image4
Force Motors : फोर्स मोटर्सची रेकॉर्डब्रेक घोडदौड; काय आहे यामागील रहस्य?
Recommended image5
AI या ५ नोकऱ्या कधीच हिसकावणार नाही! कारण जाणून भीती होईल दूर
Related Stories
Recommended image1
शिवनेरी-शिवशाहीनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ बस; एसटीचा ऐतिहासिक निर्णय, जाणून घ्या कधीपासून धावणार
Recommended image2
पुणे-मुंबईपासून जवळच या ठिकाणी साजरा करा Valentine Day, प्रेमाला चढेल गुलाबी रंग
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved