सार
सध्या इनकम टॅक्स विभागाच्या नावावरुन काहीजणांना एक नोटीस धाडण्यात आली आहे. खरंतर, इनकम टॅक्सची आलेली नोटीस खरी की खोटी असा प्रश्न बहुतांशजणांना पडला आहे. याची पडताळणी कशी करायची याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Income Tax Notice : जर तुम्ही टॅक्सपेअर आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. खरंतर, सध्या इनकम टॅक्स विभागाकडून बनावट नोटीसा नागरिकांना धाडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशातच नागरिकांना इनमक टॅक्सची नोटीस आल्यानंतर भिती वाटू लागली आहे. पण तुम्हालाही इनकम टॅक्सच्या नावाने एखादी नोटीस आलीय का? ही नोटीस खरी की खोटी कसे ओखळायचे याबद्दलच्या ट्रिक्स जाणून घेऊया...
दरम्यान, बनावट इनकम टॅक्सच्या नोटीस नागरिकांना पाठवून त्यांची फसवणूक केली जाते. यामुळेच फसवणूकीपासून दूर राहण्यासाठी इनकम टॅक्स संदर्भातील काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
अशी तपासून पाहा नोटीस
इनकम टॅक्स विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन टूल्सच्या मदतीने इनकम टॅक्सच्या नावाने आलेली नोटीस तपासून पाहू शकता. याशिवाय इनकम टॅक्सच्या सूचना किंवा अन्य महत्त्वाची माहितीही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिलेली आहे.
ऑनलाइन टूल्सच्या मदतीने तुम्हाला इनकम टॅक्सच्या नावाने धाडण्यात आलेली नोटीस खरी आहे की खोटी हे तपासून पाहता येणार आहे. याची सुविधा इनकम टॅक्स विभागानेच नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. खास गोष्ट अशी की, टूलचा वापर करण्यासाठी तुम्हाला इनकम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करण्याचीही गरज नाही. ही एक प्री-लॉग इन सुविधा असून त्याचा कोणीही वापर करू शकतो.
अशी तपासून पाहा
- सर्वप्रथम इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ येथे भेट द्या
- येथे Quick Links वर क्लिक करुन Authenticate Notice/Order Issued by ITD वर क्लिक करा
- PAN किंवा DIN पैकी एका पद्धतीने पडताळणी करा
- तुम्ही PAN कार्डच्या माध्यमातून पडताळणी करणार असल्यास तुम्हाला डॉक्युमेंट टाइप, असेसमेंट इअर, इश्यू डेट आणि मोबाइल क्रमांक अशी सर्व माहिती द्यावी लागेल
- DIN चा पर्याय निवडल्यास नोटिवर उपलब्ध असलेल्या DIN आणि OTP वेरिफिकेशनसाठी मोबाइल क्रमांक द्यावा लागेल
- मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल
- ओटीपी दिल्यानंतर ठिकाण टाका आणि Continue वर क्लिक करा
- ऑनलाइन टूल तुम्हाला दाखवेल की, तुम्हाला धाडण्यात आलेली इनकम टॅक्सची नोटीस खरी आहे की नाही
आणखी वाचा :
पहिल्यांदाच केलेल्या कमाईतून Investment Plan करण्यासाठी 8 खास टिप्स
दुकानदार नाणी घेत नसेल तर चिंताग्रस्त होऊ नका, वाचा RBI चा नियम