- Home
- Utility News
- स्मार्टफोन पाहून चेहऱ्यावर येईल हसू, हे ५ मोबाईल नवीन वर्षात मार्केटमध्ये होणार दाखल
स्मार्टफोन पाहून चेहऱ्यावर येईल हसू, हे ५ मोबाईल नवीन वर्षात मार्केटमध्ये होणार दाखल
डिसेंबर महिन्यात विवो, शाओमी, वनप्लस, रियलमी आणि ओप्पो कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन बाजारात येत आहेत. या लेखात Redmi 15C, OnePlus 15R, आणि Realme P4x यांसारख्या बजेट-फ्रेंडली आणि शक्तिशाली फोन्सची माहिती दिली आहे.

स्मार्टफोन पाहून चेहऱ्यावर येईल हसू, हे ५ मोबाईल नवीन वर्षात मार्केटमध्ये होणार दाखल
डिसेंबर महिन्यात विवो, शाओमी, वनप्लस, रियलमी आणि ओप्पो कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन बाजारात येत आहेत
Vivo X300 आणि Vivo X300 Pro
डिसेंबर महिन्यात स्मार्टफोन मार्केटमध्ये येणार आहेत. विवोपासून ते शाओमी, वनप्लस , रियलमी आणि ओप्पोपर्यंत अनेक शक्तिशाली आणि बजेट-फ्रेंडली फोन भारतीय बाजारात येणार आहेत. आपण नवीन फोन घेणार असाल तर हि सुवर्णसंधी आपल्यासाठी आहे.
Redmi 15C
शाओमी कंपनी त्यांचा फोन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणार आहे. चीनमध्ये हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 4G मॉडेल हीलियो G81-अल्ट्रा चिपसेटसह येते आणि 5G मॉडेल डायमेंशन 6300 सह येते. हा फोन ११, ४९९ रुपयांना मिळणार आहे.
OnePlus 15R
वनप्लस १७ हा फोन डिसेंबरमध्ये लॉन्च केला जाणार आहे. कंपनीकडून असं सांगण्यात आलं आहे की, हा जगातील पहिला फोन असेल जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसरसह येईल. हा फोन अमेझॉनवर दाखल होणार असून वनप्लस पॅड गो 2 देखील लाँच करण्यात येणार आहे.
Realme P4x
रिअलमी आपला फोन घेऊन P4x स्मार्टफोन 4 डिसेंबर रोजी भारतात लाँच करणार आहे आणि त्याची विक्री फ्लिपकार्टवर करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 7400 अल्ट्रावर आधारित असेल आणि 144Hz हाय-रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. या फोनच बजेट १६,००० रुपयांपेक्षा कमी असू शकतो.
Oppo Reno 15C
Oppo ने आपल्या Oppo Reno 15 सीरिजसह Oppo Reno 15C देखील मार्केटमध्ये येणार आहे, जी डिसेंबर 2025 मध्ये चीनमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. अद्याप कंपनीकडून या सगळ्याची खात्री देण्यात आलेली नाही. २०२६ च्या सुरुवातीला हा फोन मार्केटमध्ये येईल.

