२०२६ स्कोडा कुशकचा टीझर झाला रिलीज, गाडीमध्ये काय असणार खास?
स्कोडा कुशाकचा नवीन फेसलिफ्ट मॉडेल लवकरच येणार असून, कंपनीने याचा टीझर लॉन्च केला आहे. या गाडीच्या डिझाइन, केबिन आणि वैशिष्ट्यांमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यात नवीन एलईडी लाईट्स, लाईट बार आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांचा समावेश आहे.

२०२६ स्कोडा कुशकचा टीझर झाला रिलीज, गाडीमध्ये काय असणार खास?
भारतामध्ये सर्वात जास्त चालणाऱ्या गाड्यांच्या नावामध्ये सर्वात आधी स्कोडा कुशाक या गाडीचा समावेश होतो. टाटा सियारा, मारुती विकटोरीयस आणि किया सेलटॉस या गाड्यांसोबत या गाडीची स्पर्धा परत एकदा होणार आहे.
स्कोडा कुशाक गाडीचा टिझर लॉन्च
स्कोडा कुशाक या गाडीचा टिझर लॉन्च करण्यात आला असून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर त्याला पाहिलं आहे. या गाडीला टिझरमध्ये पूर्ण झाकलेली असून तिच्याबद्दलची माहिती समोर आली आहे.
डिझाईनमध्ये काय होणार बदल
या गाडीच्या डिझाईनमध्ये कंपनीच्या वतीने बदल करण्यात आला आहे. स्कोडा कुशाकमध्ये एलईडी डीआरएल आणि सीक्वेंशियल एलईडी टर्न इंडिकेटरसह नवीन एलईडी हेडलॅम्प असणार आहेत.
लाईट बार मिळणार
या गाडीमध्ये कंपनीकडून लाईट बार दिला जाणार आहे. टिझरमध्ये याबद्दलची माहिती समजली आहे. यात नवीन डिझाइनचे १७-इंच अलॉय व्हील्स आणि नवीन ररंगाचे पर्याय कंपनीकडून देण्यात येणार आहे.
कंपनी अजून काय देणार?
मागील बाजूस, लाईट बारसह रॅपअराउंड टेल-लॅम्प मिळणार असून तर पुढील आणि मागील दोन्ही बंपरची रचना देखील नवीन असणार आहे. गाडीमध्ये अनेक अपडेट देण्यात आले आहेत.
केबिनमध्ये काय देणार?
केबिनमध्ये देखील बदल दिसून येणार असून नवीन रंगीत थीम आणि अपहोल्स्ट्री यांचा समावेश असणार आहे. १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ८-इंच डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले आणि ८-स्पीकर साउंड सिस्टम यांचा समावेश आहे.
इतर काय असणार वैशिष्टय?
त्यात मागील एसी व्हेंट्ससह स्वयंचलित हवामान नियंत्रण, हवेशीर फ्रंट सीट्स आणि वायरलेस फोन चार्जर यांचा समावेश आहे. स्कोडामध्ये पॅनरेमिक सनरूफ कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

