सार
Worli Hit and Run Case Update : वरळी येथील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहला मुंबईतील एका न्यायालयाने 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर हिट अँड रन प्रकरणात एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
Worli Hit and Run Case Update : वरळीतील बीएमडब्लू हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. मंगळवारी (16 जुलै) मुंबईतील एका कोर्टाने मिहीर शाहच्या न्यायलयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश देत 30 जुलैपर्यंत सुनावली आहे. 16 जुलैला मिहिर शाहची पोलीस कोठडी पूर्ण झाली होती. यानंतर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी मिहिर शाहला शिवडी कोर्टासमोर हजर केले होते.
हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू
24 वर्षीय मिहिरवर कथित रुपात बीएमडब्लू कारने एका दुचाकी वाहनाला धडक दिल्याचा आरोपात अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत कावेरी नखवा नावाच्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुकाचीला धडक दिल्यानंतर महिलेला दीड किलोमीटर गाडीने ओढत नेले होते.
मद्यपान करुन चालवत होत गाडी
पोलिसांनी म्हटले सीसीटीव्ही फुटेजमध्ये असेही दिसतेय की, शाहने महिलेचा मृतदेह कार खालून काढला आणि रस्त्यावर असाच फेकून पळून गेला. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, मिहिर शाहने मद्यपान करुन दुचाकीला धडक दिली होती. दरम्यान, मिहिर शाहला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने दारु पिण्याची त्याला सवय असल्याचे कबुल केले आहे. एवढेच नव्हे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मिहिरने आपले केस आणि दाढी देखील कापली होती. या प्रकरणात पोलिसांकडून न्हाव्याचीही साक्ष घेतली आहे.
मिहिर शाहला असे केले अटक
महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतरच्या प्रकारानंतर मिहिरने पळ काढला होता. सूत्रांनी सांगितले होते की, अपघातानंतर मिहिरने सर्वप्रथम त्याच्या वडिलांना फोन केला होता. वडिलांनीच मिहिरला पळ काढण्याचा सल्ला दिला होता. यानंतर मिहिरने आपली कार आणि ड्रायव्हरला वांद्रे येथील कलानगर येथे सोडले. याशिवाय पोलिसांकडून अटक होईल याच्या भीतीपोटी कारची नंबर प्लेटही हटवली.
या एकूणच घटनेत मिहिरने प्रेयसी, बहिणीलाही नक्की घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून मिहिर शाह, त्याचा परिवार, प्रेयसी आणि जवळच्या मित्रांना फोन करुन सतत ट्रॅक केले जात होते. सर्वांचे फोन बंद येत होते. अशातच 8 जुलैला रात्री मिहिर मित्रासोबत विरारला आला. 9 जुलैला सकाळी मित्राने फोन सुरु केला असता पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाले आणि मिहिरला अटक केली. याशिवाय पोलिसांनी मिहिरची आई आणि बहिणीला देखील ताब्यात घेतले होते.
आणखी वाचा :
IAS पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण झाले बंद, अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरलाही होणार शिक्षा