Fashion Tips: मैत्रिणींनो हायटेड दिसायचंय? ट्राय करा असे कुर्ते, लोक म्हणतील Just Looking A Wow

| Published : Dec 01 2023, 04:12 PM IST / Updated: Dec 26 2023, 11:43 AM IST

beauty

सार

Women Fashion: तरूणींमध्ये शॉर्ट कुर्ते परिधान करण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुर्तेही मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. पण उंची कमी असलेल्या तरूणींनी कोणत्या प्रकारचे कुर्ते जीन्सवर परिधान करावेत? जाणून घेऊया सविस्तर माहिती…

Kurti Fashion Designs : जीन्ससोबत एखादा टॉप घालावा की कुर्ता ? यावरून बऱ्याच जणींचा गोंधळ उडतो. खासकरून शारीरिक उंची कमी असलेल्या तरूणींनी आपण हाइटेड कसे दिसू? याची अधिक काळजी असते. पण काही विशेष प्रकारचे स्टाइल फॉलो केल्यास आपण नक्कीच हायडेट दिसाल. सध्या जीन्सवर शॉर्ट कुर्ता परिधान करण्याचा ट्रेण्ड वाढत आहे. उंचीने लहान असलेल्या तरूणींनी कोणत्या प्रकारचा कुर्ता जीन्सवर परिधान केल्यास सुंदर लुक मिळेल? पाहुया...

उंची कमी असल्यास कुर्ता खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर्वप्रथम जीन्सवर कोणत्या प्रकारचा कुर्ता सुंदर दिसेल हे पाहावे. याशिवाय तुमच्या शरीराच्या आकारानुसार कुर्ता खरेदी करा. जेणेकरून जीन्स आणि कुर्तामध्ये उंची अधिक दिसेल.

फ्लोरल प्रिंट

फ्लोरल प्रिंट असणारे कुर्ते उंची कमी असलेल्या तरूणींवर शोभून दिसू शकतील. फ्लोरल प्रिंटसह अंगरखा स्टाइल असणारा कुर्ता देखील खरेदी करू शकता. जीन्सवर अंगरखा कुर्ता छान दिसतो. या डिझाइनमध्ये वेगवेगळे फ्लोरल प्रिंट आणि रंग पाहायला मिळतील. ऑनलाइन अथवा बाजारात अंगरखा स्टाइलचे कुर्ते खरेदी करू शकता.

मोठी प्रिंट

जीन्ससोबत मोठ्या डिझाइनचे प्रिंट असलेले कुर्ते परिधान करू शकता. यामुळे लुक अधिक खुलून दिसतो. याशिवाय तुम्ही हायटेडही दिसाल. पण मोठी प्रिंट अगदी किचकट नसावी. यामुळे लुक बिघडू शकतो. याशिवाय कुर्तीच्या रंगाकडे देखील लक्ष द्या.

थ्रेड वर्क

थ्रेड वर्क असणारे कुर्तेही कमी उंची असलेल्या तरूणींवर सुंदर दिसतात. यामध्ये अधिक स्टायलिश दिसाल. थ्रेड वर्क असणारा कुर्ता थोडा सैल असल्यास आपण हायडेट दिसू शकता. थ्रेड वर्क असलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.

फ्रंट स्टाइल कट

आजकाल फ्रंट स्टाइल कटचा ट्रेण्ड वाढत आहे. वेगवेगळ्या डिझाइनचे फ्रंट स्टाइल कट असणारे कुर्ते बाजारात सहज मिळतील. उंचीने कमी असल्यास लॉन्ग कुर्ताही परिधान करू शकता. या डिझाइनच्या कुर्तीवर आकाराने मोठे असलेले कानातले शोभून दिसतील.

कॉलर असणारा लॉन्ग कुर्ता

स्टायलिश आणि हायडेट लुक मिळावा, यासाठी कॉलर पॅटर्न लाँग कुर्ता नक्की ट्राय करून पाहा. सिंपल आणि कॉटन फॅब्रिकचा लॉन्ग कुर्ता आपण खरेदी करू शकता. लॉन्ग कुर्ताचे देखील वेगवेगळे रंग आणि डिझाइन्स तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील.

कोल्ड शोल्डर कुर्ता

हटके लुक ट्राय करायचे असल्यास कोल्ड शोल्डर कुर्ता परिधान करू शकता. कोल्डर शोल्डर कुर्तामध्ये स्टायलिश स्लीव्ह्स अथवा वेगवेगळ्या गळ्याचे डिझाइन्स मिळतील. जीन्ससोबत कोल्ड शोल्डर कुर्ता नक्कीच छान दिसेल.

आखणी वाचा: 

Hair Care Tips: ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवताय? होऊ शकतात हे मोठे नुकसान

Beauty Tips : महागडे प्रोडक्ट वापरूनही मेकअप लुक परफेक्ट दिसत नाही? मग तुम्ही

Fashion Tips: पेस्टल आउटफिट्सवर स्टायलिश लुकसाठी अशी निवडा ज्वेलरी