MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं; रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे जळगाव-भुसावळकरांची चांदी

मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं; रेल्वेच्या 'या' निर्णयामुळे जळगाव-भुसावळकरांची चांदी

Amrit Bharat Express train details: मध्य रेल्वेने पनवेल-अलीपूरद्वार 'अमृत भारत एक्स्प्रेस' सुरू केली आहे, ज्यात ११ जनरल डबे असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना विनाआरक्षण स्वस्तात मुंबई गाठता येणार आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 21 2026, 03:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं
Image Credit : Asianet News

मुंबई गाठणं आता आणखी स्वस्त! आरक्षणाचं टेन्शन मिटलं

मुंबई : मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वाढती गर्दी आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 'अमृत भारत एक्स्प्रेस'सह विशेष गाड्यांबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. यामुळे आता ऐनवेळी प्रवासाचा बेत आखणाऱ्यांनाही खिशाला परवडणाऱ्या दरात मुंबई गाठता येणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
'अमृत भारत एक्स्प्रेस'चा प्रवाशांना आधार
Image Credit : ANI

'अमृत भारत एक्स्प्रेस'चा प्रवाशांना आधार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेली पनवेल-अलीपूरद्वार अमृत भारत साप्ताहिक एक्स्प्रेस येत्या २३ फेब्रुवारीपासून नियमित धावणार आहे. या गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ११ जनरल डबे आहेत.

विनाआरक्षण प्रवास: जनरल डब्यांची संख्या जास्त असल्यामुळे ज्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट नाही, त्यांनाही कमी खर्चात आणि सुलभतेने प्रवास करता येईल.

कोणाला होणार फायदा? ही गाडी कल्याण, नाशिक रोड, जळगाव आणि भुसावळ अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार असल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. 

Related Articles

Related image1
Kalyan Taloja Metro : कल्याण-तळोजा ‘मेट्रो 12 A’ला मंजुरी; 8414 कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामीण भागालाही मिळणार वेगवान कनेक्टिव्हिटी
Related image2
महानगरपालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? शिंदे-राज भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग
35
गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग
Image Credit : South Western Railways - SWR

गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग

गाडी क्र. ११०३१ (पनवेल ते अलीपूरद्वार): दर सोमवारी सकाळी ११:५० वाजता पनवेलवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १:५० वाजता पोहोचेल.

गाडी क्र. ११०३२ (अलीपूरद्वार ते पनवेल): दर गुरुवारी पहाटे ४:४५ वाजता सुटेल आणि शनिवारी सकाळी ५:३० वाजता पनवेलला येईल.

प्रमुख थांबे: इटारसी, जबलपूर, प्रयागराज, पाटलीपुत्र आणि न्यू जलपाईगुडी. यामुळे यूपी, बिहार आणि बंगालला जाणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होईल. 

45
दादर-भुसावळ विशेष गाड्यांना मुदतवाढ
Image Credit : South Western Railways - SWR

दादर-भुसावळ विशेष गाड्यांना मुदतवाढ

उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी म्हणजे, पश्चिम रेल्वेने दादर-भुसावळ साप्ताहिक आणि त्रिसाप्ताहिक विशेष गाड्यांना मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे जळगाव, धुळे आणि भुसावळ परिसरातील नागरिकांना मुंबईला येण्या-जाण्यासाठी जास्तीचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. 

55
आधुनिक सुविधांची मेजवानी
Image Credit : South Western Railways - SWR

आधुनिक सुविधांची मेजवानी

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि आरामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण २२ डबे असून, ८ स्लीपर कोच आणि प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी पॅन्ट्री कारचीही सुविधा देण्यात आली आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maharashtra Economy : वर्ष 2030 पर्यंत महाराष्ट्र होणार १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, फडणवीसांनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
Recommended image2
Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी! २ लाखांपर्यंत कर्जमाफी; पण ‘हे’ काम केल्याशिवाय लाभ मिळणार नाही
Recommended image3
आळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न, संग्राम महाराज भंडारे यांनी केला आरोप
Recommended image4
जरांगेंचा नवा इशारा: मराठा आरक्षणावरून परत आंदोलन होणार, वाद चिघळण्याची शक्यता
Recommended image5
सुनेत्रा पवारांचा राजीनामा; राज्यसभेच्या जागेचं कोणाला मिळणार तिकीट?
Related Stories
Recommended image1
Kalyan Taloja Metro : कल्याण-तळोजा ‘मेट्रो 12 A’ला मंजुरी; 8414 कोटींच्या प्रकल्पामुळे ग्रामीण भागालाही मिळणार वेगवान कनेक्टिव्हिटी
Recommended image2
महानगरपालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा? शिंदे-राज भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved