Woman Meets Strict Teacher After 10 Years : दहा वर्षांनंतर मुंबई लोकल ट्रेनमध्ये आपल्या जुन्या 'कडक' शिक्षिकेला भेटल्याचा अनुभव एका तरुणीने शेअर केला आहे. त्या दोघींमधील संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

Woman Meets Strict Teacher After 10 Years : आपल्या सर्वांच्या आयुष्यात मुलांना भीती दाखवून थरथर कापायला लावणारे एक शिक्षक किंवा शिक्षिका नक्कीच असतात. अशाच एका शिक्षिकेला १० वर्षांनंतर मुंबई लोकल ट्रेनमध्ये भेटल्याचा अनुभव एक तरुणी सांगत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीत ही अनपेक्षित भेट झाली. १० वर्षांनंतर आपल्या जुन्या शाळेतील शिक्षिकेला ट्रेनमध्ये भेटल्याचा आनंद कृपाया नावाच्या तरुणीने शेअर केला आहे.

शाळेत असताना या शिक्षिका खूप 'कडक' होत्या आणि तब्बल १० वर्षांनंतर त्यांची भेट होत असल्याचे कृपाया रहाटे सांगते. आपण सध्या काय करतो, हेही कृपाया आपल्या शिक्षिकेला सांगते. 'मी सध्या एका यूएस ट्रेडरसाठी काम करत आहे, ते आता लवकरच संपेल. त्यानंतर, स्वतःचे काहीतरी सुरू करण्याची इच्छा आहे,' असे कृपाया आपल्या शिक्षिकेला सांगताना दिसते.

View post on Instagram

शिक्षिका कितीही कडक असल्या तरी आपल्या विद्यार्थिनीच्या प्रगतीचा कोणत्या शिक्षिकेला अभिमान वाटणार नाही? त्याचप्रमाणे, या शिक्षिकाही हसून हे सर्व ऐकत आहेत. सोबतच त्या तरुणीला मिठी मारतानाही दिसत आहेत. 'माझ्या त्या कडक शिस्तीच्या शिक्षिकेला मी १० वर्षांनंतर भेटले. मला पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आलेला तो आनंद आणि अभिमान माझ्यासाठी पुरेसा आहे,' असे कृपायाने व्हिडिओसोबत लिहिले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल झाला आहे. जुन्या शिक्षकांना भेटणे ही किती अभिमानाची गोष्ट आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. शिक्षिका आणि विद्यार्थिनी या दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचेही अनेकांनी सांगितले.