- Home
- Mumbai
- मुंबईकरांचा प्रवास आता अधिक 'कूल'! पश्चिम रेल्वेवर धावणार १२ नवीन AC लोकल; पाहा तुमच्या स्टेशनची वेळ आणि पूर्ण वेळापत्रक
मुंबईकरांचा प्रवास आता अधिक 'कूल'! पश्चिम रेल्वेवर धावणार १२ नवीन AC लोकल; पाहा तुमच्या स्टेशनची वेळ आणि पूर्ण वेळापत्रक
Mumbai New AC Local Trains : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन १२ नवीन वातानुकूलित AC लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला. या फेऱ्या चर्चगेट ते विरार दरम्यान जलद, धीम्या अशा दोन्ही मार्गांवर धावतील.

मुंबईकरांचा प्रवास आता अधिक 'कूल'! पश्चिम रेल्वेवर धावणार १२ नवीन AC लोकल
मुंबई : उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकर प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने सुखद धक्का दिला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि एसी लोकलची वाढती मागणी लक्षात घेता, पश्चिम रेल्वेने आपल्या ताफ्यात १२ नवीन वातानुकूलित (AC) लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यानचा प्रवास आता अधिक गारेगार आणि सुखकर होणार आहे.
नव्या १२ फेऱ्यांचे नियोजन कसे असेल?
नव्याने सुरू होणाऱ्या १२ फेऱ्यांपैकी ६ फेऱ्या 'अप' मार्गावर आणि ६ फेऱ्या 'डाऊन' मार्गावर चालवण्यात येतील. विशेष म्हणजे, कामावर जाणाऱ्यांची सोय व्हावी यासाठी जलद आणि धीम्या अशा दोन्ही मार्गांवर या लोकल धावतील.
३ जलद आणि ३ धीम्या फेऱ्या (अप मार्ग)
२ जलद आणि ४ धीम्या फेऱ्या (डाऊन मार्ग)
कधी सुटणार पहिली आणि शेवटची लोकल?
चर्चगेटच्या दिशेने (Up): पहिली एसी लोकल गोरेगाववरून पहाटे ०५:१४ वाजता सुटेल, तर शेवटची फेरी सायंकाळी ०७:०६ वाजता असेल.
विरार/बोरिवलीच्या दिशेने (Down): चर्चगेटवरून पहिली एसी लोकल सकाळी ०६:१४ वाजता सुटेल, तर शेवटची गाडी रात्री ०८:०७ वाजता सुटेल.
कोणत्या स्थानकांसाठी किती फेऱ्या?
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीनुसार विविध स्थानकांसाठी या फेऱ्यांचे विभाजन केले आहे.
विरार - चर्चगेट - विरार: ४ फेऱ्या
गोरेगाव - चर्चगेट - गोरेगाव: ४ फेऱ्या
बोरिवली - चर्चगेट - बोरिवली: २ फेऱ्या
भाईंदर - चर्चगेट - भाईंदर: २ फेऱ्या
वेळेचे व्यवस्थापन
या १२ फेऱ्यांपैकी ४ फेऱ्या सकाळी गर्दीच्या वेळी, ४ फेऱ्या संध्याकाळी गर्दीच्या वेळी आणि उर्वरित ४ फेऱ्या दुपारच्या सत्रात चालवल्या जातील.
प्रवाशांना काय फायदा होणार?
सध्याच्या एसी लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी पाहता, नवीन १२ फेऱ्यांमुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः गोरेगाव आणि भाईंदर यांसारख्या मध्यवर्ती स्थानकांवरून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. १२ डब्यांच्या या नवीन वातानुकूलित ईएमयू (AC EMU) सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

