- Home
- Mumbai
- नवी मुंबईकरांनो सावधान! पनवेल-कळंबोली मार्गावर मेगाब्लॉक; या वेळेतच निघा नाहीतर अडचणीत पडाल
नवी मुंबईकरांनो सावधान! पनवेल-कळंबोली मार्गावर मेगाब्लॉक; या वेळेतच निघा नाहीतर अडचणीत पडाल
Panvel Kalamboli Railway Block : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामामुळे मध्य रेल्वेने पनवेल ते कळंबोली दरम्यान रात्रीचा मेगाब्लॉक जाहीर केला. १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारीला होणाऱ्या या ब्लॉकमुळे १६ मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणारय.

नवी मुंबईकरांनो सावधान! पनवेल-कळंबोली मार्गावर मेगाब्लॉक
नवी मुंबई : जर तुम्ही येत्या काही दिवसांत रेल्वेने रात्रीचा प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'च्या (DFCCIL) कामासाठी पनवेल ते कळंबोली दरम्यान मध्य रेल्वेने विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. या कामामुळे तब्बल १६ मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
नेमके काय आहे कारण?
DFCCIL प्रकल्पांतर्गत या मार्गावर ११० मीटर लांब आणि १५०० मेट्रिक टन वजनाचा महाकाय 'ओपन वेब गर्डर' बसवण्यात येणार आहे. हे काम अत्यंत जिकिरीचे आणि तांत्रिक कौशल्याचे असल्याने, रेल्वेने १८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान दर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्लॉकचे वेळापत्रक, डायरीमध्ये नोंदवून ठेवा
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, खालील तारखांना आणि वेळेत रेल्वे वाहतूक विस्कळीत राहील.
१८ जानेवारी: मध्यरात्री १:२० ते ३:२० (२ तास)
२५ जानेवारी: मध्यरात्री १:२० ते ५:२० (४ तास)
३ फेब्रुवारी: मध्यरात्री १:२० ते ४:२० (३ तास)
१० फेब्रुवारी: मध्यरात्री १:२० ते ३:२० (२ तास)
१२ आणि १४ फेब्रुवारी: पहाटे २:०० ते ४:०० (२ तास)
प्रवाशांवर काय परिणाम होणार?
१. १६ मेल/एक्स्प्रेसवर परिणाम: या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबवण्यात येईल.
२. गाड्यांना उशीर: रेल्वेने स्पष्ट केले आहे की, गाड्या रद्द केल्या जाणार नाहीत, परंतु अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विलंबाने धावतील.
३. ३ महत्त्वाच्या गाड्यांवर थेट परिणाम: तीन प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
रेल्वेचे आवाहन
"प्रवाशांनी स्थानकावर येण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक किंवा 'NTES' ॲप तपासावे. रात्रीच्या प्रवासाचे नियोजन करताना ब्लॉकची वेळ लक्षात घेऊनच घराबाहेर पडावे, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही."

