Shloka Mehta bracelet : अंबानींची सून, घालते हे ब्रेसलेट, जाणून घ्या याची खासियत
मुंबई - अंबानी घराण्याची मोठी सून श्लोका नेहमीच फॅशनच्या बाबतीत ट्रेंड सेट करते. तिचे कपडे, दागिने, घड्याळं आणि हँडबॅग्जचं कलेक्शन नेहमीच चर्चेत असतं.

अंबानींची सून..
मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख असलेले मुकेश अंबानी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही चर्चेत असतात. आता मुकेश अंबानी यांची सून श्लोका मेहता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. श्लोका नेहमीच फॅशनच्या बाबतीत ट्रेंड सेट करते. तिचे कपडे, दागिने, घड्याळं आणि हँडबॅग्जचं कलेक्शन नेहमीच चर्चेत असतं. आता तिच्या एका ब्रेसलेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ब्रेसलेटची खासियत..
नुकतंच श्लोका मेहता मासूम मिनावाला पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. साध्या लूकमध्ये तिने सर्वांना प्रभावित केले. तिच्या हातातील एका मण्यांच्या ब्रेसलेटने सर्वांचे लक्ष वेधले. हा ब्रेसलेट ती नेहमीच घालते. कोणत्याही कार्यक्रमाला, कोणतेही कपडे घातले तरी हा ब्रेसलेट तिच्या हातात असतोच. यामागचं कारण काय ते जाणून घेऊया...
मुलांवरील प्रेमापोटी...
हा ब्रेसलेट ती फॅशनसाठी नाही तर मुलांवरील प्रेमापोटी घालते. तिच्या मुलांवर, पृथ्वी आणि वेदा, यांच्यावरील प्रेमाची आठवण म्हणून ती हा ब्रेसलेट घालते. या तीन ओळींच्या मण्यांच्या ब्रेसलेटवर पृथ्वी, वेदा आणि मम्मा (श्लोका) असे लिहिलेले आहे. म्हणूनच हा ब्रेसलेट तिच्यासाठी खास आहे. कोणतेही कपडे घातले तरी ती हा ब्रेसलेट विसरत नाही. एकीकडे मुलांवरील प्रेम व्यक्त करत असतानाच दुसरीकडे तो फॅशनेबलही दिसतो. या छोट्याशा ब्रेसलेटद्वारे श्लोका आपल्या मुलांवर किती प्रेम करते हे दाखवून देते.

