Maharashtra Politics : शरद पवार यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

| Published : Feb 19 2024, 10:35 AM IST / Updated: Feb 19 2024, 10:38 AM IST

sharad pawar

सार

अजित पवारांचाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत शरद पवार यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकरण सध्या तापले आहे. अशातच आज (19 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात शरद पवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. या निर्णयानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

16 फेब्रुवारीला शरद पवार यांचे जेष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला अपील केले होते की, या आठवड्यात पार पडणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सत्राच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या प्रकरणावर तत्काळ विचार करावा. अशातच आज (19 फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी न्यायाधीश सूर्यकांत, दीपांकर दत्ता आणि केवी विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

शरद पवार यांच्या गटाला मिळाले नवे नाव
अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याच्या निर्णयानंतर शरद पवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान, शरद पवार यांच्या हातून राष्ट्रवादी काँग्रेस गेल्यानंतर त्यांना नवे पक्षनाव आणि पक्षचिन्ह निवडण्यास सांगितले होते. अशातच आता शरद पवार यांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' असे नाव मिळाले आहे.

दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टात एक कॅव्हिएट दाखल केले आहे. जेणेकरुन शरद पवारांच्या गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यास त्यांच्या बाजूने कोणताही पूर्वपक्षीय आदेश कोर्टाकडून दिला जाणार नाही.

आणखी वाचा : 

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' , निवडणूक आयोगाकडून मिळाले नवे पक्षनाव

Rajya Sabha Election 2024 : शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

Ashok Chavan Resigns : संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागील सांगितले कारण, पक्षाच्या नेतृत्वावर उपस्थितीत केले प्रश्न