- Home
- Mumbai
- Railway New Ticket System: रेल्वे तिकीटसाठी रांगा इतिहासजमा! आता तिकीट मिळणार थेट तुमच्या हातात, जाणून घ्या पश्चिम रेल्वेचा नवा प्लॅन
Railway New Ticket System: रेल्वे तिकीटसाठी रांगा इतिहासजमा! आता तिकीट मिळणार थेट तुमच्या हातात, जाणून घ्या पश्चिम रेल्वेचा नवा प्लॅन
Railway New Ticket System: सणांच्या गर्दीत पश्चिम रेल्वेने 'एसटी स्टाईल' तिकीट बुकिंग प्रणाली सुरू केली. यानुसार बुकिंग कर्मचारी हँडहेल्ड मशिन्सद्वारे थेट प्रवाशांना अनारक्षित तिकीट देतील, ज्याने तिकीट खिडकीवरील रांगा कमी होण्यास मदत होईल.

रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये बदल!
मुंबई: दिवाळी आणि छटपूजेसारख्या सणांच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी रेल्वेने आपल्या गावी जाण्यास प्राधान्य देतात. परिणामी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होते आणि आरक्षित तिकीट न मिळाल्याने अनेक प्रवासी अनारक्षित तिकिटांवर प्रवास करतात. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक नवा पाऊल उचलले आहे.
रेल्वे तिकिट बुकिंगसाठी 'एसटी' स्टाईल योजना!
पश्चिम रेल्वेने आता एसटी बस प्रमाणेच प्रवाशांपर्यंत तिकीट पोहोचवण्याची प्रणाली सुरू केली आहे. याअंतर्गत रेल्वेचे बुकिंग कर्मचारी थेट प्रवाशांच्या जवळ जाऊन तिकीट देतील, अगदी एसटी कर्मचारी जसे स्टॉपवर तिकीट देतात, तसंच!
या कर्मचाऱ्यांकडे खास हँडहेल्ड मशिन्स असतील, ज्यांच्या माध्यमातून तिकीट काढता येणार आहे. कॅश व ऑनलाईन पेमेंट दोन्ही सुविधा यात उपलब्ध असतील. यामुळे तिकीट खरेदीसाठी लागणारी रांग टाळता येणार आहे.
ही सुविधा कोणत्या स्थानकांवर सुरू आहे?
सुरुवातीला ही नवी तिकीट वितरण सेवा मुंबई सेंट्रल विभागातील पुढील स्थानकांवर उपलब्ध असेल
मुंबई सेंट्रल
वांद्रे टर्मिनस
बोरिवली
लवकरच ही सुविधा सूरत आणि उधना स्थानकांवरही उपलब्ध होणार आहे.
वांद्रे टर्मिनसवर खास तयारी
दिवाळी आणि छठच्या काळात उत्तर भारतात जाणाऱ्या अनारक्षित गाड्यांची संख्या सर्वाधिक वांद्रे टर्मिनस येथून असते. त्यामुळे नऊ बुकिंग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, स्थानकावरील गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणाही अधिक सक्रिय करण्यात आली आहे.
नवीन उपक्रमामुळे काय लाभ?
रांगा टाळल्या जातील
वेळेची बचत
सहज व जलद तिकीट सेवा
डिजिटल पेमेंटची सोय
सणाच्या काळातील गर्दीवर नियंत्रण
रेल्वेचा आधुनिकतेकडे वाटचाल करणारा महत्त्वपूर्ण निर्णय!
ही सेवा यशस्वी झाल्यास भविष्यात इतर स्थानकांवरही याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अशा निर्णयामुळे प्रवाशांना सुलभ, जलद आणि आरामदायक सेवा मिळेल, हे निश्चित!

