- Home
- Utility News
- Diwali Special Train: दिवाळीत गावी जायचंय? मग ही स्पेशल ट्रेन लिस्ट चुकवू नका, वेळापत्रक आताच पाहा!
Diwali Special Train: दिवाळीत गावी जायचंय? मग ही स्पेशल ट्रेन लिस्ट चुकवू नका, वेळापत्रक आताच पाहा!
Diwali Special Train: दिवाळी आणि छठपूजा सणांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. २२ ऑक्टोबर २०२५ पासून मुंबई, पुणे आणि नागपूर येथून उत्तर भारतातील विविध शहरांसाठी या गाड्या धावणार आहेत.

दिवाळी स्पेशल ट्रेन
Diwali Special Train: दिवाळी आणि छठपूजा या प्रमुख सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने खास सण स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. 22 ऑक्टोबर 2025 पासून या गाड्या विविध मार्गांवर धावणार असून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.
मुंबईहून धावणाऱ्या फेस्टिव्हल स्पेशल गाड्या
01031 CSMT – वाराणसी विशेष
प्रस्थान: सकाळी 07:35
मुख्य थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, भुसावळ, जबलपूर, प्रयागराज छिवकी
01047 CSMT – दानापूर विशेष
प्रस्थान: दुपारी 15:00
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, जबलपूर, दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा
01079 CSMT – गोरखपूर विशेष
प्रस्थान: रात्री 22:30
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, मनमाड, इटारसी, भोपाळ, लखनऊ, बस्ती, खलीलाबाद
मुंबईहून धावणाऱ्या फेस्टिव्हल स्पेशल गाड्या
01143 LTT – दानापूर विशेष
प्रस्थान: सकाळी 10:30
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, जबलपूर, बक्सर, आरा
01051 LTT – बनारस विशेष
प्रस्थान: दुपारी 12:15
थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, झाशी, फतेहपूर, मिर्झापूर, वाराणसी
पुण्याहून सुरू होणाऱ्या सण विशेष गाड्या
01415 पुणे – गोरखपूर विशेष
प्रस्थान: सकाळी 06:05
थांबे: दौंड, कोपरगाव, मनमाड, इटारसी, झाशी, लखनऊ, बस्ती
01449 पुणे – दानापूर विशेष
प्रस्थान: दुपारी 15:30
थांबे: कोपरगाव, मनमाड, जबलपूर, प्रयागराज छिवकी, बक्सर, आरा
01453 हडपसर – गाझीपूर सिटी विशेष
प्रस्थान: दुपारी 16:00
थांबे: बेलापूर, कोपरगाव, चाळीसगाव, जबलपूर, वाराणसी, औंरीहार
नागपूरहून धावणारी विशेष गाडी
01207 नागपूर – समस्तीपूर विशेष
प्रस्थान: सकाळी 10:40
थांबे: बेतूल, इटारसी, भोपाळ, झाशी, कानपूर, गोरखपूर, हाजीपूर, मुजफ्फरपूर
तिकीट आरक्षण कसे कराल?
सर्व गाड्यांसाठी आरक्षण www.irctc.co.in या अधिकृत संकेतस्थळावर सुरू आहे. तसेच थांबे आणि वेळांबाबत अधिक माहितीसाठी NTES अॅप किंवा www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्या. प्रवास करताना वैध तिकीट बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
दिवाळीत रेल्वेने करा सुट्टीची सुरेख सुरुवात!
सणासुदीच्या काळात आपल्या मूळगावी जाण्याची तयारी करत असाल, तर या गाड्यांचा लाभ घ्या आणि प्रवास करा आरामदायक, सुरक्षित आणि वेळेत!

