नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सध्या मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव, ट्रम्प प्रशासनाच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे आर्थिक अस्थिरतेचे वातावरण तयार झाले असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.
दादर कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री हटवण्यासाठी जैन समाज आक्रमक झाला. महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्री आणि बांबू काढून टाकले. न्यायालयाच्या आदेशाविरोधात जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसले.
देशभरातील विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे हा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची आणि इतरांची कडक तपासणी करण्यात येत आहे.
उद्योगपती हर्ष मारिवाला यांनी त्यांच्या कंपनीतील नेतृत्वाबाबत टिप्पणी केली आहे. कोण लिडर होऊ शकतात आणि कोण होऊ शकत नाहीत हेही सांगितले आहे.
६ ऑगस्ट रोजी मुंबईत हलका पाऊस आणि दमट वातावरण राहिले. पुढील काही दिवसांतही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अपेक्षेपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
मुंबईतील कबुतरखान्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलले आहे. यानुसार, मुख्यमंत्र्यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना खाद्यपुरवठा करावा असे निर्देश दिले आहे.
मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद करण्यावरुन जैन आणि गुजराती समाज पेटला आहे. या लोकांनी आम्ही कबुतरांना खाऊ घातल्यानंतर जो काही टॅक्स लावायचा आहे तो देखील भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : हवामान विभागाने मुंबईत हलक्या पावसाचा इशारा दिला होता. पण प्रत्यक्षात पावसाने आजही मुंबईला दांडी मारली. गेले काही दिवस सतत वाढलेल्या आर्द्रतेमुळे वातावरण अधिकच दमट आणि अस्वस्थ झालं आहे.
मुंबई : उद्योजक आणि भाजप पदाधिकारी दिलावर ए. चौगले यांनी “ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया” यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली आहे. कारण त्यांनी मल्याळी परिचारिका निमिषा प्रिया यांची फाशीची शिक्षा थांबवण्यासाठी हस्तक्षेप केला.
मुंबई - सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी झपाट्याने वाढ झाली आहे. रोजच्या रोज वाढणाऱ्या या दरांमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांमध्ये चिंता वाढत आहे. गणेशोत्सवात या मागणीत आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज प्रमुख शहरांतील सोन्याचे दर काय आहेत, ते पाहूया :
mumbai