मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना सादर करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष वर्ष 2024-25 साठी 59 हजार कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईला बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे मेसेज येण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. आताही मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये शहरात सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे म्हटले आहे.
मुंबईमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुणी मध्यरात्री रहिवाशी इमारतीतील नागरिकांच्या डोअरबेल वाजवून पळत असल्याचे दिसून येत आहे.
Green Hydrogen Project : हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. याद्वारे राज्यामध्ये 64 हजार रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.
मुंबईहून लखऊच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो विमानाचे उड्डाण अचानक थांबवण्यात आले. खरंतर इंडिगोच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने माझ्या सीटखाली बॉम्ब ठेवल्याचे सर्वांना ओरडून सांगितले.
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला अखेर यश मिळाले आहे. सरकारने नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन हजारो समर्थकांसोबत मनोज जरांगे पाटील वाशीत दाखल झाले आहेत. मनोज पाटील यांची वाशीतील शिवाजी चौकात सभा पार पाडली. या सभेदरम्यान, मनोज जरांगेने सरकारला अध्यादेश काढण्यासाठी उद्या 11 वाजेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
Republic Day 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन केले आणि जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
देशाचा आज 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिल्लीतील कर्तव्य पथावर आता परेडला सुरुवात होत प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला जात आहे.
मुंबई पोलिसांच्या येत्या 28 जानेवारीपर्यंत सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.