- Home
- Maharashtra
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट!
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे, मुसळधार पावसाचा रेड अलर्ट!
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने २० ऑगस्ट रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासाठी अलर्ट जारी केला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट रोजीही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Moderate rain or thundershowers very likely to occur at most places over Madhya Maharashtra and Light to moderate rain or thundershowers very likely to occur at many places over Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/eP1C6rNxhz— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 19, 2025
पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट
रायगड जिल्हा आणि पुणे घाटमाथा परिसरात अतिशय जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा, तसेच नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
इतर जिल्ह्यांची स्थिती
कोकण
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
विदर्भ
नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून, पावसाची उघडीप कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

