MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • School Holiday Alert: मुसळधार पावसामुळे शाळा-कॉलेज उद्याही बंद, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?; जाणून घ्या

School Holiday Alert: मुसळधार पावसामुळे शाळा-कॉलेज उद्याही बंद, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का?; जाणून घ्या

School Holiday Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रायगड, सातारा, लोणावळा, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Aug 19 2025, 09:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
110
Image Credit : our own

मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे, अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज उद्याही बंद राहणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तुमच्या शहरात सुट्टी आहे की नाही, ते खालील माहितीमध्ये सविस्तर वाचा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
210
Image Credit : stockPhoto

या जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी

रायगड

रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्थांना उद्या २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles

Related image1
मुंबईत ३०० मिमी पाऊस; रेड अलर्ट कायम, चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल
Related image2
Mumbai Monorail : अखेर सर्व प्रवाशांना सुखरुप वाचविले, भक्तीपार्कजवळ मोनोरेल पडली होती बंद
310
Image Credit : iSTOCK

सातारा

जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे, पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड आणि सातारा या तालुक्यांतील शाळांना २० आणि २१ ऑगस्ट अशा दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. इतर तालुक्यांमध्ये पावसाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

410
Image Credit : gemini AI

लोणावळा

मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा नगर परिषदेने शहरातील सर्व शाळांना पुढील दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.

510
Image Credit : getty

पालघर

पालघर जिल्ह्यातही उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली आहे.

610
Image Credit : X-@AkanchaS

पावसाचा अलर्ट आणि प्रभावित जिल्हे

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे.

710
Image Credit : X-@Brezzy_Drive

रेड अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा.

810
Image Credit : X-@rushikesh_agre_

ऑरेंज अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, आणि गडचिरोली.

910
Image Credit : X

यलो अलर्ट

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

1010
Image Credit : Gemini AI

तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती आणि सुट्टीच्या निर्णयाबद्दल अधिकृत माहितीसाठी स्थानिक प्रशासनाच्या सूचना तपासत रहा.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rohit Pawar | मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा, रोहित पवार यांचे अन्नत्याग स्थगित
Recommended image2
Operation Tiger | शिवसेनेचे 4 खासदार मातोश्रीवर उपस्थित, तर 5 ऑनलाईन उपस्थित
Recommended image3
Shivsena MP : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना बळ; ठाकरेंचे इतके खासदार नॉटरिचेबल?
Recommended image4
SHARAD PAWAR : शरद पवार भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंची मोठी ऑफर
Recommended image5
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर भुजबळांचे सूचक विधान, वाचून म्हणाल हे कस झालं?
Related Stories
Recommended image1
मुंबईत ३०० मिमी पाऊस; रेड अलर्ट कायम, चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल
Recommended image2
Mumbai Monorail : अखेर सर्व प्रवाशांना सुखरुप वाचविले, भक्तीपार्कजवळ मोनोरेल पडली होती बंद
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved