MUMBAI NORTH EAST Lok Sabha Election Result 2024: ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांनी विजय मिळवला आहे.
SOUTH CENTRAL Lok Sabha Election Result 2024: दक्षिण मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळाले असून अनिल देसाई हे ५५ हजार ४३६ मतांनी विजयी झाले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे पराभूत झालेत.
MUMBAI NORTH WEST Lok Sabha Election Result 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (UBT) अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी दिली, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने रवींद्र वायकर यांना येथून उमेदवारी दिली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
पुढील 48 तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही पाऊस पडणार आहे.
पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीची काही डबे रुळावरून घसरले. बोईसर स्थानकातून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी घसरली. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबईसह उपनगरात आज हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच ठाणे, रायगड जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशतः ढगाळ राहील. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे.
जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार आहे.