- Home
- Mumbai
- Mumbai Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात, पाहा सोहळ्याचे खास Photos
Mumbai Lalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात, पाहा सोहळ्याचे खास Photos
लालबागच्या राजाच्या भव्य मिरवणुकीला आज पहाटे जल्लोषात सुरुवात झाली.लालबागच्या रस्त्यांवर "गणपती बाप्पा मोरया"च्या गजरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. तर पाहा राजाच्या विसर्जन मिरवणुकीचे काही खास फोटोज.

भव्य मिरवणुकीची सुरुवात
लालबागच्या राजाच्या 2025 च्या विसर्जन मिरवणुकीला आज पहाटे जल्लोषात सुरुवात झाली. भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी "गणपती बाप्पा मोरया"च्या गजरात बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात केली.
भक्तीचा महासागर
लालबाग परिसरात भक्तांचा प्रचंड जनसागर उसळला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धेने संपूर्ण मिरवणूक भक्तिमय रंगात रंगली गेली आहे.
बँडच्या तालावर बाप्पाला निरोप
बाप्पाच्या मंडपात पारंपारिक पद्धतीने बँडच्या तालावर बाप्पाला निरोप दिला गेला. यावेळीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि बाप्पाला निरोप देण्यासाठीचा उत्साह दिसून येत होता.
पुष्पमाळांनी बाप्पा मंडपाबाहेर पडला
मंडपाबाहेर मोठ्या पुष्पमाळा लावण्यात आल्या होता. बाप्पा जसा पुढे सरकत होता तशीतशी एक पुष्पमाळ बाप्पाच्या गळ्यात घातली जात होती.
अखेर तो क्षण
अखेर बाप्पा त्याच्या महालातून बाहेर पडल्याचा क्षण तेथे उपस्थिती असलेल्या प्रत्येकाने आपल्या डोळ्यात, कॅमेऱ्यात टिपला. यावेळी भाविकांची तुफान गर्दी आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसला.
भव्य मिरवणूक
बाप्पाची भव्य मिरवणूक सुरू होण्यासह भाविकांची अलोट गर्दी होताना दिसून येत आहे. बाप्पाला आनंदात निरोप दिला जात आहे.
भाविकांचा उत्साह
राजाला निरोप देण्याचा उत्साह आणि पाणावलेले डोळे असे सर्व दृष्य आज लालबागनगरीत दिसून येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त आणि पोलिसांकडून कठोर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

