लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला थोड्याच वेळास सुरुवात होणा आहे आहे. यासाठी मंडपात कार्यकर्त्यांसह भाविकांची बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
Lalbaugcha Raja Visarjan Live : मुंबईच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण मानला जाणारा लालबागचा राजा आज भक्तांच्या अश्रूंनी आणि उत्साहात निरोपाला निघाला. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सकाळपासूनच मुंबईकरांसह राज्यभरातून लाखो भक्त विसर्जन मिरवणुकीसाठी लालबाग येथे जमले आहेत.आता बाप्पाची आरती सुरू आहे.
भक्तांची गर्दी आणि उत्साह
लालबाग परिसरात पहाटेपासूनच भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. गणेशभक्त बाप्पाच्या चरणी शेवटचे दर्शन घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे होते. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वेशभूषेत नाचणारे मंडळातील तरुण आणि भक्तांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. अनेक भक्तांनी बाप्पाच्या मूर्तीसमोर आरती करत, फुले व नारळ अर्पण करून निरोप देत आहेत.
सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांचा बंदोबस्त
मुंबई पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, वाहतूक विभाग व स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही आणि तात्पुरत्या वॉच टॉवरद्वारे संपूर्ण मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात आले. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले असून, भक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.
विसर्जन मिरवणुकीचा भव्य सोहळा
लालबागच्या राजाची मूर्ती पारंपरिक रथात बसवून भक्तांच्या जयघोषात मिरवणूक निघते. मुंबईतील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हजारो भक्त दर्शनासाठी थांबतात. ही मिरवणूक पुढील अनेक तास चालू राहते, शेवटी गिरगाव चौपाटी येथे पारंपरिक विधीपूर्वक बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे.



