Indian Scientists Discover Ancient Galaxy Alaknanda : १२ अब्ज प्रकाशवर्ष दूर आणि सुमारे ३०,००० प्रकाशवर्ष व्यास असलेली अलकनंदा आकाशगंगा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप वापरून शोधण्यात आली, असे संशोधक राशी जैन यांनी सांगितले.
Mahaparinirvan Din 2025 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विभाग ३ ते ५ डिसेंबरला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' ही विशेष मोफत सहल आयोजित केलं. यात नागरिकांना बाबासाहेबांच्या मुंबईतील महत्त्वपूर्ण स्मृतीस्थळांना भेट देता येईल.
Mumbai Local : मध्य रेल्वेने मुंबई, उपनगरातील परळ, कल्याण, LTT, पनवेल या 4 प्रमुख स्थानकांवर 20 नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार असून, प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल.
Seawoods Darave Railway Station Rename : हार्बर लाईनवरील सीवूड्स-दारावे स्टेशनचे नाव आता 'सीवूड्स-दारावे-करावे' असे बदलण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून आणि स्थानिकांच्या मागणीनुसार परिसरातील 'करावे' गावाचा नावामध्ये समावेश केला.
Mumbai Local : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मध्य, हार्बर मार्गावर १२ विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार असून, दादर स्थानकावरही प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त व्यवस्था केली.
Mumbai Metro Line 8 Project : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो-8 लाईनला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली. हा प्रकल्प दोन्ही विमानतळांमधील प्रवासाचा वेळ २ तासांवरून ३० मिनिटांवर आणेल.
Chikhloli New Railway Station : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली नावाचे नवे स्टेशन उभारले जाते. एमयूटीपी-3ए अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे कल्याण-बदलापूर मार्गावरील गर्दी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणारय
Mumbai Metro 3 Monthly Pass : मुंबई मेट्रो 3 ॲक्वा लाईनवर आता मासिक पास सुविधा सुरू झाली आहे. 'मेट्रो कनेक्ट 3 ॲप' द्वारे उपलब्ध असलेला हा डिजिटल पास प्रवाशांना रोजच्या तिकीट खरेदीच्या त्रासातून मुक्त करतो आणि प्रवासावर बचत करण्याची संधी देतो.
Mumbai Local Mega Block : रविवारी ३० नोव्हेंबरला मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर मोठ्या मेगाब्लॉकची घोषणा केली. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द होतील, विलंबाने धावतील, त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.
Mumbai Local : वाढत्या प्रवासी संख्येमुळे, पश्चिम रेल्वेने विरार-डहाणू मार्गावर प्रथमच 15 डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. चर्चगेट-विरार मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असून, यामुळे लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
mumbai