- Home
- Mumbai
- नवी मुंबईकरांनो, लोकल प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा! रेल्वे मंत्रालयाने 'या' स्टेशनचं नाव बदललं; नवीन नाव आणि कारण एका क्लिकवर!
नवी मुंबईकरांनो, लोकल प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा! रेल्वे मंत्रालयाने 'या' स्टेशनचं नाव बदललं; नवीन नाव आणि कारण एका क्लिकवर!
Seawoods Darave Railway Station Rename : हार्बर लाईनवरील सीवूड्स-दारावे स्टेशनचे नाव आता 'सीवूड्स-दारावे-करावे' असे बदलण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून आणि स्थानिकांच्या मागणीनुसार परिसरातील 'करावे' गावाचा नावामध्ये समावेश केला.

हार्बर लाईनवरील या स्टेशनचं नाव बदललं
Seawoods Darave Railway Station Rename: हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्या नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने नवी मुंबईतील एका प्रमुख स्थानकाच्या नावात मोठा बदल केला असून त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.
हार्बर लाईनवर स्टेशनचं नवं रूप, 'सीवूड्स-दारावे-करावे'
नवी मुंबईतील सीवूड्स-दाऱावे हे लोकप्रिय स्टेशन आता नव्या नावाने ओळखले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने त्याचे अधिकृत नाव बदलून ‘सीवूड्स-दारावे-करावे’ असे ठेवले आहे. महाराष्ट्र सरकारकडून आलेल्या विनंतीनुसार हा निर्णय घेण्यात आला.
हार्बर लाईन नवी मुंबई आणि मुंबई शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने, स्थानिक भागांचा विचार करून तिन्ही ठिकाणांचा समावेश नवीन नावात करण्यात आला आहे.
नाव बदलण्यामागचं कारण काय?
सीवूड्स – परिसरातील प्रमुख हाउसिंग सोसायट्यांचा उल्लेख
दारावे व करावे – आसपासच्या पारंपरिक गावांची नावे
स्थानिकांच्या मागणीनुसार दोन्ही गावांचाही समावेश करण्यासाठी हे नवे नाव देण्यात आले. त्यामुळे आता स्टेशनच्या नावात संपूर्ण परिसराचे प्रतिनिधित्व होणार आहे.
स्टेशन कोडमध्येही बदल
स्टेशनच्या नावासोबतच त्याचा कोडही बदलण्यात आला आहे.
जुना कोड: SWDV
नवा कोड: SWDK
लवकरच नवे नाव आणि कोड स्टेशन बोर्डांवर दिसेल
मध्य रेल्वेने हा बदल तत्काळ लागू असल्याचे सांगितले असून, लवकरच नवे नाव आणि कोड स्टेशन बोर्डांवर आणि रेल्वेच्या अधिकृत यादीत दिसू लागतील.

