- Home
- Mumbai
- ब्रेकिंग! मध्य रेल्वे प्रवाशांना मिळाली सर्वात मोठी भेट, 'या' दोन स्टेशनच्या मधोमध होणार नवीन स्टेशन; संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
ब्रेकिंग! मध्य रेल्वे प्रवाशांना मिळाली सर्वात मोठी भेट, 'या' दोन स्टेशनच्या मधोमध होणार नवीन स्टेशन; संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
Chikhloli New Railway Station : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान चिखलोली नावाचे नवे स्टेशन उभारले जाते. एमयूटीपी-3ए अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे कल्याण-बदलापूर मार्गावरील गर्दी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळणारय

लोकल प्रवाशांसाठी मेगा गुडन्यूज! नवं स्टेशन कुठे उभं राहतंय?
मुंबई : मुंबईच्या लोकलला ‘लाईफलाईन’ म्हटलं जातं, पण वाढत्या प्रवाशांमुळे गर्दीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वे आणि राज्य सरकारकडून अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर नव्या स्थानकाचे बांधकाम जोरात सुरू आहे.
कल्याण–बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका,मेगा प्रोजेक्टला वेग
कल्याण ते बदलापूरदरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याचे काम हे मध्य रेल्वेचे सर्वात महत्त्वाचे उपक्रमांपैकी एक. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर
लोकल ट्रेनची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार
वारंवार धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवास अधिक जलद होणार
गर्दीतून मोठा दिलासा मिळणार
ताज्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे 30% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एमयूटीपी-3ए अंतर्गत जोरदार कामकाज
एमआरव्हीसीद्वारे एमयूटीपी-3ए अंतर्गत हा प्रकल्प राबवला जात आहे. संपूर्ण कामासाठी 1,510 कोटी रुपयांचा बजेट अंदाज आहे. या अंतर्गत विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ येथे प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. आता या संपूर्ण उपक्रमातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे नव्या स्टेशनचे बांधकाम!
नवे स्टेशन कुठे येणार? लोकेशन अखेर निश्चित!
अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान चिखलोली नावाचे नवे स्टेशन उभारले जात आहे.स्टेशन इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब पूर्ण झाला असून पुढील बांधकाम वेगाने सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
या नव्या स्थानकामुळे
अंबरनाथ आणि बदलापूर येथील प्रवासी भार मोठ्या प्रमाणात कमी होईल
गर्दी कमी होऊन लोकल प्रवास अधिक आरामदायक होणार
वाढत्या लोकसंख्येला पर्यायी थांबा उपलब्ध होणार
या नव्या स्टेशनमुळे कल्याण–बदलापूर मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर होणार
मध्य रेल्वेच्या या नव्या स्टेशनमुळे कल्याण–बदलापूर मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि गर्दीविरहित होईल. चिखलोली स्टेशन हे या भागातील प्रवाशांसाठी मोठा गेमचेंजर ठरणार आहे.

