- Home
- Mumbai
- Mahaparinirvan Din 2025 : बाबासाहेबांचं मुंबईतलं घर पाहायचंय?, पर्यटन विभागाचा खास मोफत उपक्रम सुरू
Mahaparinirvan Din 2025 : बाबासाहेबांचं मुंबईतलं घर पाहायचंय?, पर्यटन विभागाचा खास मोफत उपक्रम सुरू
Mahaparinirvan Din 2025 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विभाग ३ ते ५ डिसेंबरला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट' ही विशेष मोफत सहल आयोजित केलं. यात नागरिकांना बाबासाहेबांच्या मुंबईतील महत्त्वपूर्ण स्मृतीस्थळांना भेट देता येईल.

बाबासाहेबांच्या मुंबईतील पाऊलखुणा, एक मोफत सफर
Mahaparinirvan Din 2025: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी 6 डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर लाखो नागरिक दर्शनासाठी येतात. यंदा चैत्यभूमीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने एक खास आणि स्तुत्य उपक्रम जाहीर केला आहे.
3 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमांतर्गत पर्यटकांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ या विशेष मोफत सहलीत सहभागी होण्याची अद्वितीय संधी मिळणार आहे. या सहलीतून पर्यटकांना बाबासाहेबांचे विचार, जीवनकार्य आणि त्यांच्या मुंबईतील स्मृतीस्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
तीन दिवसीय मोफत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’
बाबासाहेबांचे कार्य प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे, त्यांच्या विचारांचा अधिक जवळून अनुभव घ्यावा या उद्देशाने पर्यटन विभागाने 3, 4 आणि 5 डिसेंबर या तीन दिवसांसाठी विशेष टूर सर्किटचे आयोजन केले आहे.
पर्यटकांना भेट देता येणार प्रमुख स्थळे
चैत्यभूमी – दादर
राजगृह – बाबासाहेबांचे निवासस्थान
वडाळा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स कॉलेज
डॉ. आंबेडकर भवन
परळ – बीआयटी चाळ (बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान)
फोर्ट – सिद्धार्थ महाविद्यालय
या सर्व ठिकाणांना भेट देऊन पर्यटकांना बाबासाहेबांच्या क्रांतिकारी कार्याचा, संघर्षाचा आणि विचारप्रवाहाचा अनुभव मिळणार आहे.
सहलीची वेळ व ठिकाण
सुरुवात: 3 डिसेंबर, सकाळी 9.30 वाजता
ठिकाण: वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क परिसर
समारोप: चैत्यभूमी, दादर
या टूरच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार आणि वारसा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
नागरिकांसाठी सुवर्णसंधी
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या स्मृतींत डोकावण्याची, त्यांचं मुंबईतील जीवन आणि कार्य जाणून घेण्याची ही संधी पूर्णपणे मोफत आहे. इतिहास, समाजसेवा आणि विचारांचे दालन उघडणारी ही सहल नक्कीच पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

