मुंबईकरांना 7 एप्रिलपर्यंत उष्णतेचा तडाखा बसणार, IMD ने जाहीर केला अॅलर्ट
Mumbai Weather Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उकाडा अधिक वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच हवामान खात्याने मुंबईकरांसाठी अॅलर्ट जारी केला आहे.
- FB
- TW
- Linkdin
)
मुंबईत उष्णतेचा पारा वाढला
मुंबईकर कडाक्याच्या उन्हामुळे वैतागले आहेत. अंगाची ल्हाईल्हाई होत असल्याने उकाड्यापासून कधी सुटका होईल याची वाट पाहत आहेत.
मुंबईतील तापमान
अशातच गुरुवारी सांताक्रुझ येथील तापमान 36.9 डिग्री सेल्सिअसवरुन 34.5 डिग्रीवर पोहोचले गेले. तापमानाची ही स्थिती पुढील काही दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येल्लो अॅलर्ट जारी
हवामान खात्याने 5, 6 आणि 7 एप्रिलसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी येल्लो अॅलर्ट जारी केला आहे. यावेळी कडक उन्हाच्या झळा बसण्याची शक्यता आहे.
तापमानाचा अंदाज
3 एप्रिलला सांताक्रुझमधील हवामान खात्यने 34.5 डिग्री तापमानाची नोंद केली होती. जी सामान्य तापमानाच्या 1.4 डिग्रीपेक्षा थोडी अधिक होती. तर कुलाबा हवामान खात्याने 33.9 डिग्री तापमान जे सामान्य तापमानाच्या 1.5 डिग्रीने अधिक होते.
अशी घ्या काळजी
- सध्याच्या मुंबईतील कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडताना संपूर्ण शरीरभर कपडे परिधान करा.
- हाइड्रेट रहा.
- घराबाहेर पडताना बॅगेत पाण्याची बॉटल सोबत ठेवा.
- त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून सनस्क्रिनचा वापर करा.
- सध्याच्या दिवसात दुपारी काम नसताना घराबाहेर पडणे टाळा.